मीडिया रिपोर्ट्सनुसार पोलिसांनीही या घटनेची दखल घेतली आहे. सतना शहरातील सह जिल्हाधिकारी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या धवरी चौकात ही घटना घडली आहे. व्हिडिओमध्ये पुतळ्याची तोडफोड करणारे उपद्रवी शिवराज सरकारच्या विरोधात घोषणा देत होते. तसंच ते जवाहरलाल नेहरूंच्या पुतळ्यावर लाठीमार आणि दगडफेक करत होते. बॅट, तवा, काठीने दररोज बेदम मारहाण करायची बायको; वैतागलेल्या प्रिन्सिपल नवऱ्याने अखेर...; CCTV मध्ये भयानक दृश्य कैद या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यासह आता बुधवारी काँग्रेस पक्षाचे लोक नेहरू पुतळ्याजवळ धरणे आंदोलनाला बसले. यानंतर सीएसपीसह कोतवाली पोलीस घटनास्थळी पोहोचले. सध्या काँग्रेस पक्षाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, याशिवाय काही संशयितांना ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.यह विडीओ मध्यप्रदेश के सतना ज़िले का है। जहाँ देश के पूर्व प्रधानमंत्री स्व.जवाहरलाल नेहरू जी की प्रतिमा को कुछ असामाजिक तत्व क्षतिग्रस्त कर रहे है।
यह घटना बेहद निंदनीय है। pic.twitter.com/CPlDwWef3w — Kamal Nath (@OfficeOfKNath) May 25, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.