साध्वी प्रज्ञासिंह यांना जावेद अख्तर यांनी दिले 10 पैकी 10 गुण, कारण...

साध्वी प्रज्ञासिंह यांना जावेद अख्तर यांनी दिले 10 पैकी 10 गुण, कारण...

प्रसिद्ध कवी, गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर उपहासात्मक टीका केली आहे. त्यांनी भोपाळच्या भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह यांचं नाव तर घेतलं नाही पण त्यांच्या वक्तव्यांचा उल्लेख केला आहे.

  • Share this:

मुंबई, 23 एप्रिल : प्रसिद्ध कवी, गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर उपहासात्मक टीका केली आहे. त्यांनी भोपाळच्या भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह यांचं नाव तर घेतलं नाही पण त्यांच्या वक्तव्यांचा उल्लेख केला आहे.

साध्वी प्रज्ञासिंह यांच्याबद्दल जावेद अख्तर यांनी केलेलं एक ट्वीट व्हायरल झालं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी साध्वी प्रज्ञासिंह यांना 10 पैकी 10 गुण बहाल केले आहेत.

जावेद अख्तर लिहितात... सुंदर शब्द, 1. माझ्यासाठी निवडणुका हे धर्मयुद्ध आहे. 2- ते माझ्या शापामुळे मारले गेले . 3 शत्रूचा फायदा होऊ नये म्हणून मी माझं विधान मागे घेत आहे. 4 मी बाबरी मशीद पाडण्यामध्ये सहभागी होते. 10 पैकी 10 गुण.

साध्वी प्रज्ञासिंह यांचेच शब्द वापरून जावेद अख्तर यांनी आपल्या टिकेतला उपहास अशा पद्धतीने व्यक्त केला आहे. जावेद अख्तर यांनी साध्वींवर पहिल्यांदाच टीका केलेली नाही. साध्वींना भोपाळमधून उमेदवारी दिली तेव्हाही त्यांनी ट्वीट करून आपली नाराजी व्यक्त केली होती.

साध्वी प्रज्ञासिंह या मालेगाव स्फोटातल्या प्रमुख आरोपी आहेत. या प्रकरणी त्या 9 वर्षं तुरुंगात होत्या पण नंतर तब्येतीच्या कारणामुळे त्यांची जामिनावर सुटका झाली. उमेदवारी मिळाल्यानंतर साध्वींनी केलेल्या वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

ही निवडणूक नाही तर धर्मयुद्ध आहे. त्याचबरोबर बाबरी मशीद पाडणाऱ्यांमध्ये मी सामील होते, असाही साध्वींचा दावा आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून जावेद अख्तर यांनी त्यांना लक्ष्य केलं आहे.

मुंबई हल्ल्यातले शहीद हेमंत करकरे हे माझ्या शापामुळे मारले गेले, असं वक्तव्य साध्वींनी केलं होतं. त्यावर जोरदार टीका झाल्यानंतर त्यांनी हे विधान मागे घेतलं.

================================================================================

VIDEO अक्षरमंत्र भाग 13 : असं काढा सुंदर अक्षर; आजचे शब्द - ध, न, प, फ

First published: April 23, 2019, 8:08 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading