कोरोना योध्याला लागलं TikTok चं वेड, सपना चौधरीच्या गाण्यावर बनवला जबरदस्त VIDEO

कोरोना योध्याला लागलं TikTok चं वेड, सपना चौधरीच्या गाण्यावर बनवला जबरदस्त VIDEO

या व्हिडीओमध्ये पोलीस अधिकारी काम करत असताना एक टिकटॉक युजर त्यांच्या समोर सपना चौधरीच्या गाण्यावर थिरकत आहे.

  • Share this:

जौनपुर, 12 मे : कोरोनाच्या युद्धात सध्या डॉक्टर आणि पोलीस सर्वात आघाडीवर आहेत. घरदार सोडून दिवसरात्र लोकांच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरत आहेत. मात्र सध्या एक पोलीस अधिकारी हे चर्चेत आहेत ते आपल्या टिकटॉक (TikTok) व्हिडीओमुळे.

जौनपूर पोलिसांनी एका टिकटॉक युजरबरोबर केलेला व्हिडीओ सध्या चर्चेमध्ये आहे. बजरंगनगर चौकीतील हा व्हिडीओ खूप व्हायरल होत असून यामधील तरूणी सपना चौधरीच्या गाण्यावर थिरकताना दिसत आहे.

त्यामुळे आता पोलीस स्थानकापर्यंत TikTok चं वेड पोहचलेले दिसत आहे. या व्हिडीओमध्ये पोलीस अधिकारी काम करत असताना एक टिकटॉक युजर त्यांच्या समोर सपना चौधरीच्या गाण्यावर थिरकत आहे. हा व्हिडीओ या टिकटॉक युजरन अपलोड केला आहे.

दिवसभराच्या कामानंतर पोलिसांनी विरंगुळा मिळावा म्हणून हा व्हिडीओ शूट केल्याचे बोलले जात आहे. काहींनी या पोलीस अधिकाऱ्यांवर टीकाही केली आहे.

याआधी एका पोलिसाची सिंघमगिरी

सोमवारी मध्य प्रदेश येथील दमोहचे पोलीस उप निरीक्षक मनोज यादव यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. मनोज यांनी या व्हिडीओमध्ये गाड्यांवर स्टंट करत, सिंघमगिरी केली होती. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता जौनपूर पोलिसांच्या TikTok व्हिडीओची चर्चा आहे.

हे वाचा - Corona रुग्णांचा मृत्यू कसा झाला? आता डॉक्टरांना कारण द्यावं लागणार

हे वाचा - ना औषध ना लस, 23 दिवसांच्या बाळानं फक्त आईच्या दूधानं कोरोनाला हरवलं

First published: May 12, 2020, 11:41 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading