Home /News /national /

तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या, Suicide Note मध्ये वडिलांना सांगितलं 'मला त्रास देणाऱ्यांचा बदला घ्या'

तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या, Suicide Note मध्ये वडिलांना सांगितलं 'मला त्रास देणाऱ्यांचा बदला घ्या'

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

    लखनऊ, 26 ऑगस्ट : उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) जौनपूरमध्ये (Jaunpur) एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या (suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलीने साडीच्या सहाय्याने राहत्या घरातील एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दरम्यान, या मुलीने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट (suicide note) लिहून ठेवलेली असून त्यामध्ये, ‘माझ्या मृत्यूला रुस्तम जबाबदार आहे. त्याने माझ्याशी दुष्कर्म केले आहे. बाबा तुम्ही माझ्या मृत्यूचा बदला घ्या’, असं म्हटलं आहे. या सुसाईट नोटमुळे खळबळ उडाली आहे. आत्महत्येच्या घटनेनंतर या मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी (police) तीन जणांविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी दोन आरोपींना पोलिसांनी अटक (arrested) केली आहे. मात्र मुख्य आरोपी असलेला रुस्तम अद्याप फरार आहे. त्याला पकडण्यासाठी पोलीस जोरदार शोधमोहीम राबवत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर परिसरामध्ये तणावाचं वातावरण आहे. भुसावळमधील खंडाळ्यात विवाहितेची आत्महत्या काय आहे नेमकं प्रकरण? जौनपूर जिल्ह्यातील सुरेरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका गावात राहणाऱ्या 15 वर्षीय मुलीला काही तरुण त्रास देत होते. त्यामुळे ही मुलगी खूप त्रस्त होती. मंगळवारी, ही मुलगी रात्री झोपण्यासाठी तिच्या खोलीत गेली. मात्र सकाळी खूप उशिरापर्यंत खोलीतून बाहेर आली नाही. तेव्हा आईने खोलीचा दरवाजा उघडला असता तिला धक्काच बसला. मुलीने पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली होती. हे सर्व पाहून मयत मुलीच्या आईने आरडाओरडा करण्यास सुरूवात केली. तो ऐकून लोक जमा झाले. यावेळी कुटुंबीयांना घटनास्थळावरून एक सुसाईड नोट मिळाली. त्यामध्ये संबंधित अल्पवयीन मुलीने तिच्या मृत्यूसाठी रुस्तमला जबाबदार धरले होते. रुस्तमने आपल्यासोबत दुष्कर्म केल्याचा आरोप मृत मुलीने या सुसाईड नोटमधून केला होता. तसेच बाबा, माझ्या मृत्यूचा बदला घ्या, असेही त्यात म्हटले होते. Pune Breaking: पुण्यात कोथरूड मेट्रो कारशेडमध्ये गोळीबार, मेट्रोचा कर्मचारी जखमी घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलीस अधिकारी संत प्रसाद म्हणाले, ‘25 ऑगस्ट रोजी एका 15 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी 354, 306, 7/8 या कलमांतर्गत पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.’ या प्रकरणाची दखल पोलीस अधिक्षकांनीही घेतली आहे. पोलीस अधिक्षक त्रिभुवन सिंह म्हणाले, ‘पीडित तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून आम्ही गुन्हा नोंदवला आहे. तिचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आता आम्ही दोघांना पकडलं असून मुख्य आरोपीला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वैद्यकीय अहवालानंतर आणखी गोष्टी स्पष्ट होतील.’
    First published:

    Tags: Crime, Suicide

    पुढील बातम्या