पैज लागली होती, 50 अंडी खाण्याची आणि...

पैज लागली होती, 50 अंडी खाण्याची आणि...

अंडी आणि दारू पिण्याच्या पैज लावणे एका व्यक्तीला जीवावर बेतले.

  • Share this:

जौनपूर, 04 नोव्हेंबर: अंडी आणि दारू पिण्याच्या पैज लावणे एका व्यक्तीला जीवावर बेतले. उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथे झालेल्या या घटनेत एका व्यक्तीला जीव गमवावा लागला. केवळ दोन हजार रुपयांसाठी सहजपणे लावण्यात आलेली ही पैज मात्र त्या व्यक्तीच्या मृत्यूचे कारण ठरली.

उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथील बीबीगंज बाजार येथे सुभाष यादव (वय-42) हे ट्रॅक्टर आणि बोलेरो गाडी चालवतात. शुक्रवारी संध्याकाळी सुभाष आणि त्यांचे मित्र बीबीगंज बाजारात अंड खाण्यासाठी गेले. बोलता बोलता दोघांच्यात कोण किती अंडे खाऊ शकते यावर पैज लागली. अखेर 50 अंडी आणि एक दारूची बाटली अशी पैज लागली. ही पैज जिंकल्यास दोन हजार रुपये देण्याचे ठरले होते.

मित्रासोबत लावलेली पैज सुभाषने मान्य केली आणि अंडी खाण्यास सुरुवात केली. सुभाषने दहा-वीस नव्हे तर तब्बल 41 अंडी खाल्ली पण 42वी अंडी खाताना तो खाली कोसळला. येथील लोकांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पण त्याची प्रकृती नाजूक असल्याने डॉक्टरांनी लखनऊ येथील संजय गांधी आयुर्विज्ञान संस्थेत नेण्यास सांगितले. येथे रात्री उशीरा त्याचा मृत्यू झाला.

या घटनेचे वृत्त सुभाषचा कुटुंबीयांना समजताच त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. सुभाषने दोन विवाह केले असून पहिल्या पत्नीपासून त्याला चार मुली झाल्या होत्या. मुलगा हवा म्हणून त्याने 9 महिन्यांपूर्वी दुसरा विवाह केला. त्याची दुसरी पत्नी गर्भवती असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

राज्यपालांना भेटण्यामागचं संजय राऊत यांनी सांगितलं कारण, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 4, 2019 10:51 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading