तुम्ही केरळमधलं 'जटायू अर्थ सेंटर' पाहिलंय का?

तुम्ही केरळमधलं 'जटायू अर्थ सेंटर' पाहिलंय का?

जटायू केरळच्या कोल्लममध्ये आहे. 'जटायू अर्थ सेंटर' दक्षिण केरळच्या चार टेकड्यांपर्यंत पसरले आहे.

  • Share this:

30 नोव्हेंबर : केरळमध्ये तशी फिरण्यासाठी अनेक पर्यटन स्थळं आहेत, पण एक असंही पर्यटन स्थळ आहे ज्याचं नाव तुम्ही कदाचितच ऐकलं असेल.

या स्थळाचं नाव आहे 'जटायू अर्थ सेंटर'. जटायू केरळच्या कोल्लममध्ये आहे. 'जटायू अर्थ सेंटर' दक्षिण केरळच्या चार टेकड्यांपर्यंत पसरले आहे.

हे केरळमधील सर्व पर्यटन स्थळांपैकी एक आहे जिथे संपूर्ण पर्यावरणाची काळजी घेतली जाते. इथे अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण त्यातलं मुख्य आकर्षण म्हणजे जटायू पक्षाची सगळ्यात मोठी मूर्ती. ही मूर्ती रॉक हिलवर बांधलेली आहे. या मूर्तीचं खास वैशिष्ट्य म्हणजे हिची लांबी 200 फूट, उंची 70 फूट तर रूंदी 150 फूट इतकी आहे.

या पर्यटन स्थळाला भेट दिल्यानंतर इथे केबल कारमधून सफर, सिध्द गुफा हिलिंग सेंटर अशा अनेक सुविधा आहेत. लहान मुलांसाठीही इथे अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत.

'जटायू अर्थ सेंटर'मध्ये आपण सुरक्षित जंगल ट्रेकिंगही करू शकतो.

अॅडव्हँचर आणि ट्रेकिंग आवडणाऱ्यांसाठी हे सगळ्यात उत्तम पर्यटन स्थळ आहे. अॅडव्हँचर आणि ट्रेकिंगसाठी एप्रिल 2018पर्यंत ही जागा खुली करण्यात आली आहे.

'एलिफंट रॉक हिल'मध्ये पर्यटकांना रात्रीही राहण्याची सोय आहे. 'किचन रॉक हिल'च्या गुफांमध्ये पारंपरिक गोष्टींचा भांडार आहे. इथेही पर्यटकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

इथे सगळ्यात प्रसिद्ध 'आउटडोर रिंग-बॉल स्टेशन'चाही आनंद घेता येतो. इथे पर्यटकांना छान एंजाॅय करता येतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 30, 2017 02:33 PM IST

ताज्या बातम्या