पोलिसांनी साजरा केला 3 मुलींच्या बलात्काराचा आनंद, गावाला मटनाची दावत

छत्तीसगडमधील आदिवासी बहुलू जिल्ह्यात, जशपूरमध्ये एक लाजिरवानी घटना उघडकीस आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 11, 2018 03:45 PM IST

पोलिसांनी साजरा केला 3 मुलींच्या बलात्काराचा आनंद, गावाला मटनाची दावत

छत्तीसगड, 11 जुलै : छत्तीसगडमधील आदिवासी बहुलू जिल्ह्यात, जशपूरमध्ये एक लाजिरवानी घटना उघडकीस आली आहे. जशपूरमधील मनोरा विकासखंड या गावात तीन मुलींवर बलात्कार करण्यात आला. आणि तुम्ही विश्वास नाही ठेवणार पण पोलिसांनी गावात याचा आनंद साजरा केला. यात चक्क मटन बनवून सगळ्यांना खायला घातल्याची धक्कादायक माहितीसमोर आली आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, गावात या तीन मुलींवर बलात्कार झाल्यानंतर पंचायतने पीडितेच्या कुटूंबियांना पोलीस स्टेशनमध्ये न जाण्याची धमकी दिली. पण अति शहाण्या पंचायत समितीने स्वत:च एक बैठक बोलावली आणि निर्णय जाहीर केला. यात त्यांनी आरोपींकडून 30 हजार दंड वसूल केला आणि त्याच पैशाने मटन आणून सगळ्यांना खायला घातलं.

अजब ! स्लीपर-शॉर्ट्स घातल्यामुळे पुण्याच्या 'या' हॉटेलमधून काढलं बाहेर

या निर्घृण घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती संपूर्ण घटनेची माहिती देत आहे. या व्हिडिओमधला व्यक्ती पीडित मुलींपैकी एकाचे पिता असल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या काही दिवसांआधी मुलींच्या वडिलाने या 3 मुलींना आक्षेपार्ह स्थितीत त्या मुलांसोबत पाहिलं होतं. आणि त्यानंतर हे प्रकरण पंचायतीत गेलं.

यानंतर पंचायतीने पीडितींना न्याय तर दिलाच नाही पण या उलट याचा आनंद साजरा करत सगळ्या गावाला मटन खाण्यासाठी दावत दिली. यासगळ्याची चौकशी करण्यासाठी आता वरिष्ठ पोलिसांची टीम गावात दाखल झाली आहे.

Loading...

हेही वाचा...

गोव्याचं सरकार 'व्हेंटिलेटर'वर, पर्रीकरांपासून ते आमदारांपर्यंत सगळेच आजारी !

जपानमधल्या पुरामध्ये मृतांची संख्या 179वर, भूस्खलनाने हाहाकार

या अटीवर सचिनने पाणीपुरी विकणाऱ्या बॅट्समनला दिली त्याची बॅट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 11, 2018 03:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...