कॉपी टाळण्यासाठी परीक्षेपूर्वी कपडे काढून तपासणी, घाबरुन विद्यार्थिनीनं केली आत्महत्या

कॉपी टाळण्यासाठी परीक्षेपूर्वी कपडे काढून तपासणी, घाबरुन विद्यार्थिनीनं केली आत्महत्या

  • Share this:

रायपूर, 7 मार्च : परीक्षेदरम्यान कोणत्याही विद्यार्थी-विद्यार्थिनीने कॉपी करू नये, यासाठी चक्क कपडे उतरवून त्यांची तपासणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. छत्तीसगडमधील जशपूर जिल्ह्यातील ही संतापजनक घटना आहे. यादरम्यान,कपडे काढून तपासणी होण्याच्या भीतीपोटी दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या करून आयुष्य संपवल्याचा हादरवणारा प्रकार समोर आला आहे.

नेमकी काय आहे घटना?

1 मार्च रोजी जशपूर येथील एका परीक्षा केंद्रावर दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे कपडे काढून तपासणी करण्यात आली होती. वेगवेगळ्या खोल्यांमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान एका विद्यार्थ्याकडे कॉपी आढळल्याने त्याला शाळेतून काढण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तपासणी सुरू असतानाच एक विद्यार्थिनी इतकी घाबरली की तिने आत्महत्याच केली. याप्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी चौकशीची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 4 मार्चला मुलीचा मृतदेह आढळल्यानंतर ही घटना उघडकीस आली.दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी मुलीने शाळेत घडलेला प्रकार भावाला सांगितला होता.

First published: March 7, 2019, 3:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading