Home /News /national /

पंतप्रधान मोदींना मदतीसाठी आर्त हाक घालणाऱ्या 'त्या' जपानी क्रुझवरील भारतीयांना 'कोरोना'

पंतप्रधान मोदींना मदतीसाठी आर्त हाक घालणाऱ्या 'त्या' जपानी क्रुझवरील भारतीयांना 'कोरोना'

जपानच्या (Japan) डायमंड प्रिन्सेस (Dimond princess) क्रुझवर (Cruise) अडकलेल्या 2 भारतीयांना कोरोनाव्हायरसची (Coronavirus) लागण झाली आहे,अशी माहिती जपानमधल्या भारतीय दूतावासाने (Indian Embassy) बुधवारी दिली.

    टोकियो, 12 फेब्रुवारी :   कोरोनाव्हायरसची  (Coronavirus) लागण झालेल्या भारतीयांची संख्या आता वाढली आहे. चीनच्या (China) वुहानहून (Wuhan) भारतात परतलेल्या 3 कोरोनाव्हायरसच्या रुग्णांवर उपचार सुरू असताना, आता जपानमध्ये (Japan) आणखी 2 भारतीयांना कोरोनाव्हायरस झाला आहे. जपानच्या डायमंड प्रिन्सेस क्रुझवर (Dimond princess cruise) अडकलेल्या 2 भारतीयांना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे, अशी माहिती जपानमधल्या भारतीय दूतावासाने (Indian Embassy) बुधवारी दिली. भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, या जहाजात एक कोरोनाव्हायरसचा रुग्ण आढळल्यानंतर या जहाजाला वेगळं ठेवण्यात आलं, ज्यामध्ये हजारो प्रवाशी आणि क्रू मेंबर्स अडकलेत. या जहाजातील प्रवाशी आणि क्रू मेंबर्सची वैद्यकीय तपासणी केली जाते आहे. या तपासणीत एकूण  174 जणांना कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचं निदान झालं आहे, त्यामध्ये 2 भारतीय क्रू मेंबर्सचाही समावेश आहे. कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हेदेखील वाचा -  पंतप्रधान मोदी आम्हाला वाचवा! जपानच्या क्रुझवर अडकलेल्या भारतीयांची आर्त हाक गेल्या आठवड्यात हे क्रुझ जपानच्या किनाऱ्यावर पोहोचलं, या क्रुझमधून हाँगकाँगमध्ये 25 जानेवारीला उतरलेल्या एका प्रवाशाला कोरोनाव्हायरस असल्याचं 2 फेब्रुवारीला समजलं. त्यानंतर जपान सरकारनं या क्रुझमधून कुणालाही बाहेर पडण्यास प्रतिबंध केला आणि या क्रुझला वेगळं ठेवण्यात आलं आहे. त्यानंतर क्रुझवर अडकलेल्या भारतीयांनी 'आम्हाला वाचवा' अशी आर्त हाक, पंतप्रधान मोदींना घातली. क्रू मेंबर्सनी सोशल मीडियावर (social media) व्हिडिओ शेअर केला होता. या क्रुझवर एकूण 3,711 प्रवासी आहेत, ज्यामध्ये 138 भारतीयांचा समावेश आहे. यामध्ये क्रु मेंबर्स आणि प्रवासी आहेत. 2 भारतीयांना कोरोनाव्हायरस झाल्याचं समजताच इतर भारतीयांमध्ये भीती निर्माण झाली आहे. आपल्याला इथून लवकरात लवकर बाहेर काढावं अशी विनंती त्यांनी भारत सरकारकडे केली आहे. 19 फेब्रुवारी, 2020 पर्यंत या जहाजाला असंच वेगळं ठेवलं जाणार आहे, असंही भारतीय दूतावासानं सांगितलं आहे. दरम्यान भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी क्रुझवर जाऊन या भारतीयांची भेट घेतली आणि त्यांना जपानचे आरोग्य आणि सुरक्षा नियम सांगून सहकार्य करण्याचं आवाहन केलं. तसंच भारतीय दूतावासाने चिंता व्यक्त करत आपण सातत्याने क्रुझ कंपनी तसंच जपानच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या संपर्कात असल्याचं सांगितलं आहे. हेदेखील वाचा - तुम्हीही असू शकता 'कोरोना'चे Super spreader! विषाणू वेगाने पसरायचं भयंकर कारण
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या