S M L

जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे अवतरले 'मोदी जॅकेट'मध्ये

आज पंतप्रधान मोदी यांच्यासोबत रोड शोमध्ये शिंजो अॅबे आणि त्यांची पत्नी खास भारतीय पोशाखात पाहण्यास मिळाले.

Sachin Salve | Updated On: Sep 13, 2017 08:26 PM IST

जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे अवतरले 'मोदी जॅकेट'मध्ये

13 सप्टेंबर : जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांचा हा दौरा भारताच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. उद्या शिंजो अॅबे यांच्या हस्ते बुलेट ट्रेन प्रकल्पाचं भूमिपूजन होणार आहे. मात्र, आज पंतप्रधान मोदी यांच्यासोबत रोड शोमध्ये शिंजो अॅबे आणि त्यांची पत्नी खास भारतीय पोशाखात पाहण्यास मिळाले.

पंतप्रधान मोदी यांच्यासोबत ओपन जिप्सीमध्ये रोड शोमध्ये शिंजो अॅबे आणि त्यांची पत्नी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. विमानतळापासून ते साबरमती आश्रमापर्यंत आठ किलोमिटरपर्यंत हा रोड शो काढण्यात आला होता. या रोड शोमध्ये शिंजो अॅबे खास 'मोदी जॅकेट'मध्ये सहभागी झाले होते. शिंजो अॅबे यांनी नेहरू जॅकेट आणि खादी कुर्ता परिधान केला होता. तर त्यांच्या पत्नी अकी अॅबे यांनी सलवार कमीज परिधान केला होता.

विशेष म्हणजे, शिंजो अॅबे आणि त्यांच्या पत्नी अकी अॅबे या वेस्टर्न कपड्यामध्ये भारतात दाखल झाले होते. पंतप्रधान मोदींनीही सर्व प्रोटोकाॅल बाजूला ठेवून विमानतळावर स्वागतासाठी पोहोचले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 13, 2017 07:12 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close