निर्भया सामूहिक बलात्कार: मुकेशची दया याचिका फेटाळली, आता राष्ट्रपतींकडे अर्ज

निर्भया सामूहिक बलात्कार:  मुकेशची दया याचिका फेटाळली, आता राष्ट्रपतींकडे अर्ज

मुकेश याच्या दया याचिकेवर आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद अंतिम निर्णय देतील

  • Share this:

नवी दिल्ली, 16 जानेवारी : निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. दिल्ली सरकारनंतर आता दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी निर्भया प्रकरणातील गुन्हेगार मुकेश याची दया याचिका फेटाळली आहे. आता त्याची दयेची याचिका गृह मंत्रालयात राष्ट्रपतींकडे पाठविण्यात येणार आहे. मुकेश याच्या दया याचिकेवर आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद अंतिम निर्णय देतील.

निर्भया प्रकरणातील दोषींची फाशी लांबणीवर

सगळ्या देशाला प्रतिक्षा असलेल्या निर्भया प्रकरणातल्या दोषींची फाशी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. या आरोपींना 22 तारखेला फाशी देणं शक्य नाही असं दिल्ली सरकारने म्हटलं आहे. मुकेश या दोषीने दयेची याचिका दाखल केल्याने ठरविलेल्या  तारखेला फाशी देणं शक्य नाही. या प्रकरणात चार आरोपींना सुप्रीम कोर्टानं दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र ही फाशी लांबणीवर टाकण्यासाठी आरोपी आपले सर्व उपाय अवलंबत आहे. फाशीची शिक्षा माफ व्हावी म्हणून आरोपींना राष्ट्रपतींकडे दयेची याचिका करण्याचा अधिकार आहे. आणि ही याचिका फेटाळल्यानंतरच शिक्षेवर अंमलबजावणी करता येते. या आधीच्या अनेक घटनांमध्ये  राष्ट्रपतींनी दयेच्या याचिका फेटाळल्या होत्या.

दया याचिकेसाठी दोषी मुकेशकडून सातत्याने प्रयत्न

निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चार गुन्हेगारांपैकी एक गुन्हेगार मुकेश याने १५ जानेवारी रोजी पातियाळा हाऊस न्यायालयात फाशीच्या शिक्षेविरोधात याचिका दाखल केली होती. दिल्ली सरकारने त्याची दया याचिका फेटाळल्यानंतर उपराज्यपाल अनिल बैजल यांच्याकडे सोपविण्यात आली होती. आज गुरुवारी अनिल बैजल यांनीदेखील मुकेशचा दयेचा अर्ज फेटाळला. त्यांनी पुढील निर्णयासाठी गृहमंत्रालयाकडे हा अर्ज सोपविला आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 16, 2020 01:01 PM IST

ताज्या बातम्या