मराठी बातम्या /बातम्या /देश /

देशभर 16 जानेवारी 'National Start-up Day' म्हणून साजरा होणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा

देशभर 16 जानेवारी 'National Start-up Day' म्हणून साजरा होणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा

देशातील त्या सर्व स्टार्टअप्सचे, सर्व इनोव्हेटिव्ह तरुणांचे अभिनंदन करतो, जे स्टार्टअपच्या जगात भारताचा झेंडा उंचावत आहेत. स्टार्टअपची ही संस्कृती देशाच्या दूरवरच्या भागात पोहोचण्यासाठी 16 जानेवारी हा राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 15 जानेवारी : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज मोठी घोषणा केली. दरवर्षी 16 जानेवारीला देशात 'राष्ट्रीय स्टार्ट-अप डे' (Natiopnal Start-Up Day) साजरा केला जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्टार्टअप उद्योजकांशी (Start up Businessman's) संवाद साधताना ही घोषणा केली. यावेळी ते म्हणाले की, मी देशातील त्या सर्व स्टार्टअप्सचे, सर्व इनोव्हेटिव्ह तरुणांचे अभिनंदन करतो, जे स्टार्टअपच्या जगात भारताचा झेंडा उंचावत आहेत. स्टार्टअपची ही संस्कृती देशाच्या दूरवरच्या भागात पोहोचण्यासाठी 16 जानेवारी हा राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, देशात मुलांमध्ये इनोव्हेशनचे आकर्षण लहानपणापासूनच निर्माण करणे आणि देशातील इनोव्हेटिव्ह उपक्रमांना संस्थात्मक रूप देण्याचा आमचा प्रयत्न आहे. 9,000 हून अधिक अटल टिंकरिंग लॅब आज मुलांना नवनवीन शोध आणि नवीन कल्पनांवर काम करण्याची संधी देत ​​आहेत. इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारत 46 व्या क्रमांकावर सरकारचे वेगवेगळे विभाग, मंत्रालये, तरुण आणि स्टार्टअप्सच्या संपर्कात राहतात. त्यांच्या आयडियांना प्रोत्साहन दिले जाते. अधिकाधिक तरुणांना इनोव्हेशनची संधी देणे हे सरकारचे प्राधान्य आहे. इनोव्हेशनबाबत भारतात सुरू असलेल्या मोहिमेचा परिणाम असा झाला आहे की ग्लोबल इनोव्हेसन इंडेक्समध्ये भारताच्या क्रमवारीतही बरीच सुधारणा झाली आहे. 2015 मध्ये भारत या क्रमवारीत 81 व्या क्रमांकावर होता. आता इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारत 46 व्या क्रमांकावर आहे. पंतप्रधान पुढे म्हणाले, 2013-14 मध्ये चार हजार पेटंट मंजूर करण्यात आले होते, तर गेल्या वर्षी त्यांची संख्या 28 हजारांहून अधिक झाली आहे. आज देशात 60 हजारांहून अधिक स्टार्टअप्स आहेत. यापैकी 42 युनिकॉर्न ($1 बिलियन पेक्षा जास्त मूल्य) आहेत. भविष्यातील तंत्रज्ञानासाठी संशोधन आणि विकासामध्ये गुंतवणूक करणे ही सरकारची प्राथमिकता आहे, असंही ते म्हणाले. देशाच्या विकासात महत्त्वाचे योगदान देण्यासाठी स्टार्टअप उद्योगांच्या क्षमतेवर पंतप्रधानांचा ठाम विश्वास आहे. हे 2016 मध्ये स्टार्टअप इंडियाच्या प्रमुख उपक्रमाच्या लॉन्चिंगमध्ये दिसून आले. सरकारने स्टार्टअप उद्योगांच्या वाढीला आणि विकासाला चालना देण्यासाठी सक्षम वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने काम केले आहे. याचा देशातील स्टार्टअप इको-सिस्टीमवर प्रचंड प्रभाव पडला आहे आणि त्यामुळे देशातील या क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे, असंही पंतप्रधान मोदींनी सांगितले.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Pm modi, Startup

    पुढील बातम्या