मॉब लिंचिंग: युवकाला बेदम मारहाण, रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू!

मॉब लिंचिंग: युवकाला बेदम मारहाण, रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू!

चोरीचा संशय घेऊन एका युवकाला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीनंतर संबंधित युवकाचा मृत्यू झाला.

  • Share this:

रांची, 24 जून: झारखंडमधील खरसावन जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चोरीचा संशय घेऊन एका युवकाला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीनंतर संबंधित युवकाचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ देखील शुट करण्यात आला होता. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जमशेदपूरवरून आपल्या गावी येणाऱ्या 24 वर्षीय तबरेज अंसारी या युवकाला घातकीडीह या गावात चोर असल्याच्या संशयावरून काही जणांनी घेरले. इतक नव्हे तर चोरीचा आरोप करत त्याला एका वीजेच्या खांबावर बांधण्यात आले आणि बेदम मारहाण करण्यात आली. तबरेजला बराच वेळ मारहाण करण्यात आली. त्यानंतर 18 जून रोजी त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. यादरम्यान मारहाणीमुळे त्याची प्रकृती बिघडली आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या घटनेचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यापैकी एकमध्ये काही जण मिळून तबरेजला बांबूने मारहाण करत असल्याचे दिसत आहे. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये त्याला जय श्रीराम आणि जय हनुमान असी घोषणा देण्यास सांगितले जात असल्याचे दिसते. तबरेज अंसरी पुण्यात वेल्डिंगचे काम करत होता. गावी ईद साजरी करण्यासाठी गेला होता. काही दिवसातच त्याचा विवाह होणार होता, अशी माहिती कुटुंबियांनी दिली.

VIRAL FACT: पिसाळलेल्या कुत्र्याचा 'तो' व्हिडिओ मुंबईतला? हे आहे सत्य

First published: June 24, 2019, 8:24 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading