अभिनेत्री तनुश्री दत्ता 'या' जागेवरून लढणार लोकसभा निवडणूक

या 14 जागांमध्ये तनुश्रीला जमशेदपूरची जागा देण्याचा विचार करण्यात आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 25, 2019 09:52 PM IST

अभिनेत्री तनुश्री दत्ता 'या' जागेवरून लढणार लोकसभा निवडणूक

झारखंड, 25 फेब्रुवारी : झारखंडच्या जमशेदपूर लोकसभा जागेवरून बॉलीवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता निवडणूक लढण्याची शक्यता आहे. झारखंडच्या पीपुल्स पार्टीच्या सुप्रीमो सूर्य सिंह बेसरा यांनी दिलेल्या माहितीमध्ये झारखंडमध्ये जनताच्या बॅनरखाली 14 वेगवेगळ्या संघटना एकत्रित आहेत ज्या लोकसभा जागा लढणार आहे.

या 14 जागांमध्ये तनुश्रीला जमशेदपूरची जागा देण्याचा विचार करण्यात आला आहे. पण अद्याप यासंदर्भात तनुश्रीने कोणतीही माहिती देली नाही आहे.

झारखंडमध्ये सध्या सगळेच राजकीय पक्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. अशाच श्रेत्रीय पार्टी झारखंड पीपुल्स पार्टीच्या सुप्रीमो सूर्य सिंह बेसरा सर्किट हाऊसमधून पार्टीच्या रणनीतिचा खुलासा केला आहे.

ते म्हणाले की, जेएमएम, उलगुलान झारखंड पक्ष, होरो राष्ट्रीय सेंगेल पक्ष, तृणमूल काँग्रेस एमसीसी, सीपीआय, सीपीएम, सीपीएमएल, आम आदमी पार्टी, बहुजन मुक्ति पार्टी, बहुजन समाज पार्टी, 14 संघटना मिळून भाजप सरकारला हारवण्याचं ठरवलं आहे.

जमशेदपूर लोकसभा जागेसाठी ते म्हणाले की, 'तनुश्री दत्ताशी यासंदर्भात चर्चा सुरू आहे. तनुश्री यांच्या वडिलांकडून यासाठी हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. त्यामुळे यावर तनुश्रीदेखील सकारात्मक निर्णय देतील'

Loading...


VIDEO :..तो बस थांबवण्यासाठी ओरडत होता, पण प्रवाशाला चिरडून एसटी थांबली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 25, 2019 09:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...