क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या पत्नीचा भाजपमध्ये प्रवेश, लोकसभेची निवडणूक लढविणार?

क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या पत्नीचा भाजपमध्ये प्रवेश, लोकसभेची निवडणूक लढविणार?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश झाल्याने त्या लोकसभेची निवडणूक लढणार का असा प्रश्न विचारला जातोय.

  • Share this:

भावनगर 3 मार्च  : भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाची पत्नी रिवबा हिने रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे नेते आणि काही मंत्र्यांच्या उपस्थितीत तिने पक्षात प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश झाल्याने त्या लोकसभेची निवडणूक लढणार का असा प्रश्न विचारला जातोय.

रिवबा या या आधी करणी सेनेच्या महिला विभागात सक्रिय होत्या. पद्मावती या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी करणी सेनेने या चित्रपटाला जोरदार विरोध केला होता. रिवबा यांना राजकोटमधून भाजपची लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी जामनगरमध्ये जाहीरसभा आहे. त्या पार्श्वभूमीवरही या घटनेकडे पाहिले जाते. गुजरातमध्ये भाजपची पकड मजबूत आहे.  भाजपला जास्तीत जास्त जागा जिंकायच्या असल्याने उमेदवारी देताना भाजप अतिशय काळीपू्र्वक उमेदवारांची निवड करण्याची शक्यता आहे.

First published: March 3, 2019, 9:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading