Home /News /national /

Jammu Terrorist Attack: 36 तास चकमक, 3 दहशतवादी ठार; मोदींचा जम्मू दौरा होता टार्ग्रेटवर?

Jammu Terrorist Attack: 36 तास चकमक, 3 दहशतवादी ठार; मोदींचा जम्मू दौरा होता टार्ग्रेटवर?

सुरक्षा दलांसोबत (security forces) सुमारे 36 तास चाललेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचे (Lashkar-e-Taiba) तीन दहशतवादी ठार झाले. यामध्ये या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर युसूफ कंत्रूचा (Yusuf Kantru) समावेश आहे.

    जम्मू, 23 एप्रिल: जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला (Jammu and Kashmir's Baramulla district) जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत (security forces) सुमारे 36 तास चाललेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचे (Lashkar-e-Taiba) तीन दहशतवादी ठार झाले. यामध्ये या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर युसूफ कंत्रूचा (Yusuf Kantru) समावेश आहे. पोलिसांनी शुक्रवारी ही माहिती दिली. यापूर्वी बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार झाल्याचा दावा पोलिसांनी केला होता, मात्र चकमक स्थळावरून तीन मृतदेह सापडले आहेत. लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख कमांडर युसूफ कंत्रू याच्यासह दोन दहशतवादी गुरुवारी चकमकीत ठार झाले, तर शुक्रवारी आणखी एक दहशतवादी मारला गेला. काश्मीर झोन पोलिसांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, चकमकीच्या ठिकाणाहून फक्त तीन मृतदेह सापडले आहेत. युसूफ डार, हिलाल शेख उर्फ ​​हंजल्ला आणि फैसल डार अशी ठार झालेल्या दहशतवाद्यांची पोलिसांनी ओळख पटवली आहे. पोलिसांनी सांगितलं की, चकमकीच्या ठिकाणाहून शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. मोहिम संपली असल्याचं त्यांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंत्रू अनेक सुरक्षा दलाचे कर्मचारी आणि नागरिकांच्या हत्येत सामील होता आणि काश्मीर खोऱ्यातील टॉप 10 वाँटेड दहशतवाद्यांमध्ये त्याचा समावेश होता. ते म्हणाला की, कंत्रू हिजबुल मुजाहिद्दीनमध्ये सक्रिय सदस्य म्हणून सामील झाला होता आणि त्याला 2005 मध्ये अटक करण्यात आली होती. कंत्रूची 2008 मध्ये सुटका झाली, मात्र 2017 मध्ये तो पुन्हा हिजबुलमध्ये सामील झाला आणि निष्पाप नागरिक, पोलीस आणि राजकीय कार्यकर्त्यांची हत्या करण्यास सुरुवात केली. नंतर तो हिजबुलमधून लष्करात सामील झाला. मार्च 2020 मध्ये विशेष पोलीस अधिकारी मोहम्मद इश्फाक डार आणि त्याचा भाऊ उमर अहमद डार, सप्टेंबर 2020 मध्ये बडगाम जिल्ह्यातील खाग भागात बीडीसी अध्यक्ष सरदार भूपिंदर सिंग आणि डिसेंबर 2017 मध्ये सीआरपीएफ जवान रियाझ अहमद रादर यांच्या हत्येतही कंत्रूचा हात होता. याशिवाय अनेक राजकीय कार्यकर्त्यांच्या हत्या, ग्रेनेड फेकण्याच्या घटना आणि पोलीस आणि लष्करी जवानांचे अपहरण आणि हत्या करण्यातही त्याचा सहभाग होता. काश्‍मीरचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी बंडखोरीविरोधी कारवाई यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल आणि खोऱ्यातील मोस्ट वॉण्टेड दहशतवाद्याचा खात्मा केल्याबद्दल सुरक्षा दलांचे अभिनंदन केले. त्यांनी कंत्रूच्या हत्येचं मोठे यश असल्याचं वर्णन केलं. पोलीस महासंचालक (डीजीपी) दिलबाग सिंग यांनी चकमकीच्या ठिकाणी भेट दिल्यानंतर सांगितलं की, हे दहशतवादी पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मदच्या आत्मघाती पथकाचा भाग होते आणि त्यांची घुसखोरी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जम्मू-काश्मीर दौर्‍यामध्ये व्यत्यय आणण्याचा मोठा कट असण्याची शक्यता आहे. प्राथमिक तपासानुसार, सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवरून घुसखोरी करून दहशतवादी गुरुवारी जम्मू शहराच्या बाहेरील भागात घुसले आणि लष्कराच्या छावणीजवळील भागात होते.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Jammu and kashmir, Terrorist attack

    पुढील बातम्या