ट्रकमध्ये स्फोट घडवून 4 दहशतवाद्यांचा खात्मा, कॅमेऱ्याद कैद झाले 5 VIDEO

जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा मोठा कट जम्मूमधील टोल नाक्यावर सुरक्षा दलानं उधळून लावला आहे.

जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा मोठा कट जम्मूमधील टोल नाक्यावर सुरक्षा दलानं उधळून लावला आहे.

  • Share this:
    श्रीनगर, 19 नोव्हेंबर : जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा मोठा कट जम्मूमधील टोल नाक्यावर सुरक्षा दलानं उधळून लावला आहे. जम्मूच्या नगरोटा भागात गुरुवारी पहाटे 5 च्या सुमारास सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. या चकमकीदरम्यान 5 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या चकमकीदरम्यानचे 5 व्हिडीओ समोर आले आहेत. टोल नाक्यावर जैश एच्या दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर गोळीबार करण्यात आला. सांभा सेक्टरमधून बुधवारी रात्री 10 वाजता दहशतवादी नगरोटा इथे येत असताना पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास टोल नाक्याजवळ सुरक्षा दलानं त्यांना गाठून त्यांच्यावर कारवाई करणार त्याचवेळी दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे दहशतवादी मोठा कट तयार करत होता. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा देखील असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे सुरक्षा दलानं तातडीनं कारवाई करत त्यांना टोल नाक्याजवळ गाठलं आणि पहाटे 5 च्या सुमारास चकमक सुरू झाली. सुरक्षा दल आणि पोलीसांनी ही कारवाई केली असून त्यामध्ये 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आल्याची माहिती मिळाली आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं पोलीस आणि सुरक्षा दलानं नगरोटा राष्ट्रीय महामार्ग बंद केला आहे. जम्मू जिल्हा पोलीस प्रमुख एसएसपी श्रीधर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसाप पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास नगरोटा परिसरात बन टोल प्लाझाजवळ काही दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला.
    Published by:Kranti Kanetkar
    First published: