Nagrota Encounter : पाकिस्तानी म्होरक्यासोबत संपर्कात होते दहशतवादी, धक्कादायक पुरावे समोर

Nagrota Encounter : पाकिस्तानी म्होरक्यासोबत संपर्कात होते दहशतवादी, धक्कादायक पुरावे समोर

जम्मूच्या नगरोटा येथे गुरुवारी झालेल्या चकमकीसंदर्भात महत्त्वपूर्ण खुलासे करण्यात आले आहेत.

  • Share this:

श्रीनगर, 21 नोव्हेंबर : जम्मूच्या नगरोटा इथे टोल नाक्यावर झालेल्या चकमकीत जैश एच्या 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. गुरुवारी सुरक्षा दल आणि पोलिसांनी ट्रकमध्ये स्फोट घडवून आणला आणि लपलेल्या दहशतवाद्यांना ठार केलं. घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांवरून धक्कादायक खुलासा झाला आहे. जम्मूच्या नगरोटा येथे गुरुवारी झालेल्या चकमकीसंदर्भात महत्त्वपूर्ण खुलासे करण्यात आले आहेत.

चकमकीत ठार झालेले दहशतवादी पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा म्होरक्या असलेल्या बॉससोबत संपर्कात होते. याचे पुरावे देखील घटनास्थळावरून सुरक्षा दलाला मिळाले आहेत. सुरक्षा दलानं ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून पाकिस्तानी कंपनीचे डिजिटल मोबाइल रेडिओ (डीएमआर) जप्त करण्यात आला आहे.

दहशतवादी पाकिस्तानात असलेल्या बॉससोबत काय बोलत होते, ते त्या मोबाइलच्या मेसेजमध्ये सापडले. म्होरक्याने दहशतवाद्यांना संदेश पाठवला होता कुठे पोहोचलात आणि तिथली परिस्थिती काय आहे? हा मेसेज पाकिस्तानच्या शकरदड परिसरातून आल्याचा देखील संशय गुप्तचर विभागाला आहे. या प्रकरणी गुप्तखात्याकडून सध्या तपास सुरू आहे.

हे वाचा-Nagrota Encounter : मोदींच्या बैठकीत मोठा गौप्यस्फोट! 9/11 ची पुनरावृत्ती टळली

गुप्तचर विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डिजिटल मोबाईल रेडिओची निर्मिती मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स या पाकिस्तानी कंपनीने केली आहे. डिजिटल मोबाइल रेडिओवरील मेसेज देखील अगदी स्पष्ट दिसत आहे. LOCमधून घुसखोरी केल्यानंतर दहशतवादी म्होरक्याच्या संपर्कात गोते आणि त्याव्यतिरिक्त दहशतवाद्यांनी घातलेले शूज देखील कराचीमध्ये तयार करण्यात आल्याचं सांगितलं आहे. याशिवाय घटनास्थळावरून त्याचवेळी वायरलेस सेट व एक जीपीएस डिव्हाइसही ताब्यात घेण्यात आले.

सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नगरोटा घटनेनंतर त्याबद्दल सविस्तर चर्चा आणि विचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या सुरक्षा यंत्रणेतले महत्त्वाचे गुप्तचर, राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा (NSA) आणि गृहमंत्री (HM), परराष्ट्र सचिव (Foreign Secretary) यांची एकत्रित बैठक घेतली. त्यामध्ये धक्कादायक खुलासा झाला आहे. गुप्तचरांनी दिलेल्या माहितीनुसार, हे अतिरेकी सीमेपलीकडून भारतावर मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या उद्देशाने आले होते. 26/11 च्याच दिवशी पुन्हा एकदा तशीच खळबळ उडवून देण्याचा त्यांचा प्लॅन होता. सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे तो उद्ध्वस्त झाला.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 21, 2020, 9:33 AM IST

ताज्या बातम्या