जम्मू-कश्मीर: या फोटोमधील फक्त 2 दहशतवादी वाचले, इतर 6 जणांचा सुरक्षा दलाकडून खात्मा

जम्मू-कश्मीर: या फोटोमधील फक्त 2 दहशतवादी वाचले, इतर 6 जणांचा सुरक्षा दलाकडून खात्मा

शनिवारी सकाळी अवंतीपुरामध्ये झालेल्या या चकमकीत 6 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे.

  • Share this:

जम्मू-कश्मीर, 22 डिसेंबर : जम्मू-कश्मीरच्या पुलवामामधील त्रालमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये मोठी चकमक झाली. शनिवारी सकाळी अवंतीपुरामध्ये झालेल्या या चकमकीत 6 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. हे सगळे दहशवादी अंसार गजवत-उल-हिंद नावाच्या दहशवादी संघटनेचे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांच्या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी जाकिर मूसा आणि हमिद वाचला असून ग्रुपमधील डिप्टी कमांडर सोलिहा मोहम्मद याला देखील ठार करण्यात आलं आहे. यात हमिदबद्दलची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.

अवंतीपुरामध्ये काही दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. त्यानंतर सुरक्षा दलाकडून शनिवारी सकाळी परिसरात मोठा सापळा रचण्यात आला. संपूर्ण परिसर घेरला आणि शोध अभियान (CASO) सुरू केलं. यावेळी आपण अडकलो असल्याचं समजताच दहशवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली.

दहशतवाद्यांनी केलेल्या अचानक हल्ल्याला सुरक्षा दलांनी चोख उत्तर दिलं आणि 6 दहशतवाद्यांना जागीच ठार केलं. तर यात भारतीय सुरक्षा दलांना कोणतीही इजा झाली नाहीये. या घटनेची माहिती मिळताच इतर दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. यात कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

याआधी पुलवामामध्ये मागच्या आठवड्यात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने मोस्ट वॉन्टेड दहशतवादी जहूर ठोकरसह 3 लोकांना ठार केलं होतं. यानंतर स्थानिक आणि सुरक्षा दलांमध्ये मोठा हिंसक वाद झाला. यात 7 स्थानिक लोकांचा मृत्यू झाला होता.  यावेळी एक जवानदेखील शहीद झाला होता.

VIDEO : याला काळीज नसावच, आधी गाडीने दांपत्याला उडवलं, नंतर पळून जाताना पुन्हा चाकाखाली चिरडून निघून गेला

First published: December 22, 2018, 2:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading