Home /News /national /

खोऱ्यात दहशतवादी हल्ल्यांमागे शाहबाज कनेक्शन?, खुर्चीवर बसताच वाढला घटनांचा आलेख

खोऱ्यात दहशतवादी हल्ल्यांमागे शाहबाज कनेक्शन?, खुर्चीवर बसताच वाढला घटनांचा आलेख

गेल्या 10 दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) दहशतवादी (Terrorist Attacks) हल्ल्याचा आलेख अचानक वाढला आहे.

  श्रीनगर, 23 एप्रिल: गेल्या 10 दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) दहशतवादी (Terrorist Attacks) हल्ल्याचा आलेख अचानक वाढला आहे. दोन दिवसांत जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला (Baramulla) आणि सुंजवानमध्ये (Sunjwan) दोन मोठ्या दहशतवादी घटना घडल्या, त्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी नौगाममध्ये दहशतवाद्यांनी दोन मजुरांना गोळ्या घालून जखमी करण्यात आलं. जम्मू-काश्मीरमध्ये अचानक घडलेल्या दहशतवादी घटनांमुळे खोऱ्यातील दहशतवादी अधिक सक्रिय झाल्याचं दिसून येतंय. याची चौकशी केली असता, त्याचा थेट संबंध पाकिस्तानातील राजकीय बदलांशी जोडला गेला आहे. जिथे 10 दिवसांपूर्वी सरकार बदलले आणि शाहबाज शरीफ पंतप्रधानपदावर विराजमान होताच खोऱ्यात दहशतवादी घटनांचा महापूर आला. पाकिस्तानात शाहबाज खुर्चीवर बसताच अनेक दहशतवादी घटना घडल्या, मात्र सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून लावले. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाचा आलेख वाढला बारामुल्लामध्ये दहशतवाद्यांनी एका घराला आपलं लपण्याचे ठिकाण बनवलं होतं आणि त्याच्या मदतीने ते सतत गोळीबार करत होते. घरात लपलेल्या दहशतवाद्यांच्या गटात एक दहशतवादी अल्पवयीन होता, त्याचे वडील रडत होते आणि आपल्या मुलाला दहशतीच्या मार्गावर नेल्याबद्दल दहशतवाद्यांना शिव्याशाप देत होते. त्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवादी लपलेले घर उडवून दिलं. बारामुल्लामध्ये गोळीबार थांबला नाही तोवर जम्मूतील सुंजवान आर्मी कॅम्पजवळ दहशतवाद्यांनी सीआयएसएफच्या बसला लक्ष्य केलं. मात्र, सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे दोन्ही ठिकाणी दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. शाहबाज पंतप्रधान झाल्यानंतर खोऱ्यातील दहशतवादी घटनांवर एक नजर टाकूया. शाहबाज पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसताच घाटीत दहशतवादी घटना घडल्या
  • 11 एप्रिल- कुलगाम, अनंतनाग, बारामुल्ला येथे दहशतवादी घटना
  • 13 एप्रिल - कुलगाम आणि डोडा येथे हल्ले
  • 14 एप्रिल - शोपियानमध्ये दहशतवादी हल्ला
  • 15 एप्रिल - बारामुल्ला आणि राजौरी येथील घटना
  • 16 एप्रिल - अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ला
  • 18 एप्रिल - पुलवामा आणि कुपवाडा येथील घटना
  • 19 एप्रिल - कुपवाडा येथे शस्त्रे जप्त
  • 21 एप्रिल - बारामुल्ला येथे हल्ला
  • 22 एप्रिल - सुंजवान, जम्मू येथे हल्ला
  दहशतवादाचे शाहबाज कनेक्शन शाहबाज शरीफ यांनी 11 एप्रिल 2022 रोजी पाकिस्तानात पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. खुर्चीवर बसल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी घटना घडल्या. 11 एप्रिलपासून दहशतवादी घटना
  • दहशतवादी घटना - 15
  • एकूण दहशतवादी ठार - 12
  • नागरिकांचा मृत्यू - 2
  • जवान शहीद - 03
  एकूणच, शाहबाज शरीफ खुर्चीवर बसताच पाकिस्तानने खोऱ्यात दहशतीचा खेळ कसा नव्याने सुरू केला आहे, हे या आकडेवारीवरून दिसून येतं आहे. सध्या भारतीय सुरक्षा दल अत्यंत सतर्क असून दहशतवाद्यांच्या प्रत्येक हालचाली हाणून पाडण्यात गुंतले आहेत.
  Published by:Pooja Vichare
  First published:

  Tags: India, Jammu and kashmir, Pakistan, Terrorist attack

  पुढील बातम्या