• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • Jammu Kashmir: भारतीय सैन्याची मोठी कारवाई; अनंतनागमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu Kashmir: भारतीय सैन्याची मोठी कारवाई; अनंतनागमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

File Photo

File Photo

Encounter breaks out between security forces and terrorists in Anantnag: जम्मू काश्मीरमधील अनंतनाग येथे भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली.

 • Share this:
  जम्मू काश्मीर, 10 जुलै : जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir) मध्ये पुन्हा एकदा भारतीय सैन्य (Indian Army) आणि दहशतवाद्यांमध्ये (Terrorist) चकमक झाली आहे. या दहशतवाद्यांना भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील राणीपोरा परिसरातील क्वारीगाम येथे ही चकमक सुरू आहे. या कारवाईत भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. ही चकमक अद्यापही सुरूच आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सुरक्षा दलाला अनंतनाग जिल्ह्यातील क्वारीगाम येथे दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर भारतीय सैन्याने सर्च ऑपरेशन हाती घेतलं. सैन्य दलासोबत पोलिसांचे आणि सीआरपीएफच्या जवानांनी संयुक्तरित्या कारवाई सुरू केली. याच दरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार केला. जरंडेश्वर साखर कारखाना कर्ज वाटप प्रकरण: पुणे आणि सातारा जिल्हा बँकांना ईडीची नोटीस भारतीय सैन्याने दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण करण्यास सांगितले मात्र, दहशतवाद्यांनी आपला गोळीबार सुरूच ठेवला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला भारतीय सैन्याने सुद्धा प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. या कारवाईत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. अद्यापही या परिसरात सैन्याकडून सर्च ऑपरेशन सुद्धा सुरू आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कारवाया दिवसेंदिवस वाढत आहेत. हे सर्व पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या इशाऱ्यावर सुरू आहे. काही दिवसांपूर्वी जम्मू एअरपोर्टवर करण्यात ड्रोन हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर आता दहशतवाद्यांच्या कारवाया आणखी वाढल्या आहेत.
  Published by:Sunil Desale
  First published: