जम्मू काश्मीर : जवानांनी दोन दहशतवाद्यांचा केला खात्मा

जम्मू-काश्मीरमधील शोपियाँ जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 3, 2019 07:39 AM IST

जम्मू काश्मीर : जवानांनी दोन दहशतवाद्यांचा केला खात्मा

श्रीनगर, 3 जून : जम्मू-काश्मीरमधील शोपियाँ जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण काश्मीरमधील मोलू चित्रगम परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती भारतीय जवानांना मिळाली होती. यानंतर परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली. याचदरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. जवानांनी देखील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं. झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलं. यापूर्वी शोपियामधीलच द्रगद सुगन परिसरात शुक्रवारी (31 मे ) देखील दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं होतं.

तसंच रविवारी (2 जून ) पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्याच्या घरावरही ग्रेनेड हल्ला केला होता. ग्रेनेड हल्ल्यानंतर गोळीबारदेखील करण्यात आला होता.

(पाहा : SPECIAL REPORT : युतीचा फॉर्म्युला ठरला, लहान आणि मोठा भाऊ कोण?)(पाहा :SPECIAL REPORT : टँकरमधून सांडणारं पाणी मिळवण्यासाठी महिलांची जीवघेणी धाव!)

यापूर्वी 14 फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये मोठा दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. सीआरपीएफच्या ताफ्यावर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. यानंतर काश्मीर खोऱ्यातील हिंसाचार मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसत आहे. यामुळे भारत आणि पाकिस्तानात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाकडून वारंवार दहशतवाद्यांविरोधात तीव्र स्वरूपातील मोहीम राबवली जात आहे.

(पाहा : SPECIAL REPORT : बिर्याणीत अळ्या देणाऱ्या 'एसपीज्'च्या मालकाची ग्राहकावरच अरेरावी, दिली 'ही' धमकी)

101 दहशतवाद्यांचा खात्मा

गेल्या पाच महिन्यात जवळपास 101 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यामध्ये  76 स्थानिक दहशतवादी तर 25 परदेशी दहशतवाद्यांचा समावेश आहे. ठार करण्यात आलेले सर्वजण जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेतील असल्याची माहिती आहे.

SPECIAL REPORT : एकीच्या नशिबी परदेश दुसरीच्या बुधवार पेठ, दोन बहिणींची डोळ पाणवणारी भेट!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 3, 2019 06:54 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...