भारतीय लष्कराला सगळ्यात मोठं यश; चकमकीत 3 दहशतवादी ठार, 4 दिवसात 11 अतिरेक्यांचा खात्मा

भारतीय लष्कराला सगळ्यात मोठं यश; चकमकीत 3 दहशतवादी ठार, 4 दिवसात 11 अतिरेक्यांचा खात्मा

कुरापती करणाऱ्या पाकिस्तानला भारताने पुन्हा एकदा दणका दिला आहे. शोपियान जिल्ह्यात चार दिवसात तीन वेगवेगळ्या चकमकीत एकूण 11 दहशतवादी ठार झाले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 जून : दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील सुगो हेंधमा येथे आज सकाळी भारतीय सैन्य आणि दहशतवादी यांच्यात पुन्हा चकमक झाली. दोन्ही बाजूंकडून झालेल्या गोळीबारात 3 दहशतवादी ठार झाल्याची बातमी आहे. भारतीय सुरक्षा दलाने अजूनही संपूर्ण परिसर घेरला असून या भागात शोध मोहीम राबविली जात आहे. मुख्य म्हणजे शोपियान जिल्ह्यात चार दिवसात तीन वेगवेगळ्या चकमकीत एकूण 12 दहशतवादी ठार झाले आहेत.

माहितीनुसार भारतीय सुरक्षा दलाला दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील सुगो हेंधामा येथे काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे सैन्य, पोलीस आणि सीआरपीएफची संयुक्त टीम तयार केली गेली. भारतीय सैनिकांनी परिसराला घेराव घालून शोध मोहीम सुरू केली. पकडले जाण्याच्या भीतीनं घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सैन्यावर गोळीबार सुरू केला. दोन्ही बाजूंकडून गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले. या भागात आणखी बरेच दहशतवादी लपवल्याची माहिती लष्कराला मिळाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

वाचा-जम्मू आणि काश्मीर: 6 महिन्यांमध्ये 100पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा

वाचा-भारतीय लष्कराने उद्धवस्त केला पाकचा प्लॅन; 3 दहशतवादी ठार

4 दिवसात 12 दहशतवादी ठार

भारतीय सुरक्षा दलाने काश्मीरमधील दहशतवाद्यांचा पूर्णपणे खात्मा करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. याआधी शोपियांच्या रेबन गावात सैनिकांनी हिज्बुलच्या टॉप कमांडरसह पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला. दुसर्‍याच दिवशी शोपियानच्या पिंजुरा भागात सोमवारी सकाळी झालेल्या चकमकीत 4 दहशतवादी ठार झाले.

101 दहशतवाद्यांचा खात्मा

जानेवारी ते 8 जून या सहा महिन्यांमध्ये सुरक्षा दलांनी तब्बल 101 दहशतवाद्यांचा खात्मा केला. यानंतर सुरक्षा दलांनी आणखी 125 दहशतवाद्यांची हिट लिस्ट तयार केली असून त्यात त्यात 25 विदेशी दहशतवाद्यांचा समावेश आहे अशी माहिती लष्कराच्या 15व्या कोअर कमांडचे नेतृत्व करणारे लेफ्टनंट जनरल बी.एस.राजू यांनी दिली. तर दहशतवाद्यांशी लढताना 29 जवान आणि अधिकारी शहीद झाले अशी माहितीही त्यांनी दिली.

संपादन, संकलन-प्रियांका गावडे.

First published: June 10, 2020, 8:28 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading