शोपियाँ चकमकीत लष्कर-ए-तोयबाच्या 2 दहशतवाद्यांचा खात्मा

शोपियाँ चकमकीत लष्कर-ए-तोयबाच्या 2 दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरमधील शोपियाँ जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.

  • Share this:

श्रीनगर, 12 मे : जम्मू-काश्मीरमधील शोपियाँ जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जवानांनी परिसराला चहुबाजूंनी घेराव घातला असून येथे सध्या शोधमोहीम सुरू आहे. घटनास्थळावर आणखी दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली आहे.

वाचा :BREAKING NEWS : पाकिस्तानात आणखी एक दहशतवादी हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील शोपियाँ येथे काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली होती. गुप्त माहितीच्या आधारे जवानांनी परिसरात शोधमोहीम राबवण्यास सुरुवात केली. यादरम्यान, लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देताना जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचे नाव जाविद अहमद भट आणि आदिल बशीर वाणी असे आहे.

वाचा :जम्मू-काश्मीरमध्ये जवानांना मोठं यश, ISJKच्या कमांडरचा खात्मा

दरम्यान, सध्या परिसरात शोधमोहीम राबवली जात आहे.

कार इतक्यांदा उलटूनही 'तो' कसा वाचला, पाहा विचित्र अपघाताचा VIDEO

First published: May 12, 2019, 8:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading