• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • जम्मू-काश्मीर : दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत कर्नल आणि मेजर यांच्यासोबत 5 जवान शहीद

जम्मू-काश्मीर : दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत कर्नल आणि मेजर यांच्यासोबत 5 जवान शहीद

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

हंदवाडा सेक्टरमध्ये भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. या चमकीमध्ये पोलीस अधिकाऱ्यासह 4 जवान शहीद झाले आहेत.

 • Share this:
  जम्मू-काश्मीर, 03 मे : जम्मू-काश्मीरमधील हंदवाडा सेक्टरमध्ये भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. या चमकीमध्ये पोलीस अधिकाऱ्यासह 4 जवान शहीद झाले आहेत. एकीकडे कोरोनाचं महासंकट असताना दहशतवाद्यांच्या सातत्यानं कुरघोडी सुरू आहेत. हंदवाडा परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर भारतीय सैन्यानं हा परिसर घेरला.या चकमकीमध्ये भारतीय सैन्यातील कर्नल आणि मेजर यांच्यासोबत 5 जवान आणि पोलीस अधिकारी शहीद झाले आहेत. हंदवाडा इथे पोलीस अधिकाऱ्यानं काही दहशतवादी घरामध्ये लपून बसल्याची माहिती दिली होती. शुक्रवारी ही माहिती मिळाताच जवानांनी सर्ज ऑपरेशन सुरू केलं. कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडाच्या चंजमुल्ला भागात दहशतवादी आणि जवान यांच्यात चकमक झाली. यामध्ये चार जवान शहीद झाले आहेत. शनिवारी भारतीय सुरक्षा दलाला काही दहशतवादी हंदवाडा येथे लपून बसल्याची असल्याची माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांसह भारतीय सैनिकांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली. यावेळी  दहशतवाद्यांनी चंजमुल्ला भागात तुफान गोळीबार सुरू केला. जवान आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. त्यानंतर 5 जवान गायब असल्याची माहिती मिळाली. सैन्यदलानं या जवानांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याविषयी कोणतीही माहिती समोर आली नव्हती. रविवारी सकाळी चकमकीत शहीद झाल्याची माहिती भारतीय सैन्य दलाकडून मिळाली आहे. यामध्ये कर्नल, मेजर यांच्यासह 3 जवान आणि पोलीस अधिकाऱ्याचा सामावेश आहे. संपादन- क्रांती कानेटकर
  Published by:Kranti Kanetkar
  First published: