शोपियाँमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, चोख प्रत्युत्तर देताना जवानाला वीरमरण

Jammu Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये शोपियाँ जिल्ह्यात भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याला जवान चोख प्रत्युत्तर देत आहेत.

News18 Lokmat | Updated On: Aug 2, 2019 11:27 AM IST

शोपियाँमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, चोख प्रत्युत्तर देताना जवानाला वीरमरण

श्रीनगर, 2 ऑगस्ट : गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांकडून वारंवार भारतीय जवानांना टार्गेट केलं जात आहे. शुक्रवारी सकाळपासूनही जम्मू-काश्मीरमध्ये शोपियाँ जिल्ह्यात भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याला जवान चोख प्रत्युत्तर देत आहेत. पण जवानांशी दोन हात करताना एक जवान शहीद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (1ऑगस्ट) रात्रीपासून जवान आणि दहशतवाद्यांमध्ये ही चकमक सुरू झाली आहे. परिसरात जवळपास तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली. यानुसार बद्रहामा परिसराला चहुबाजूंनी घेराव घालत शोधमोहीम राबवण्यात आली. यादरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात एक जवान शहीद झाला. परिसरात 2 ते 3 दहशतवादी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

(पाहा : SPECIAL REPORT: भाजपचं 36/0 टार्गेट तर मुंबई काँग्रेसचे नेते दांडीबहाद्दर!)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एकूण तीन दहशतादी येथे लपून बसले होते. यातील एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आल्याचं म्हटलं जात आहे. पण यास अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. 34RR, SOG आणि CRPFच्या संयुक्त पथकांनी शोपियाँच्या पंडुशन परिसरात ही शोधमोहीम राबवण्यात आली.

(पाहा : SPECIAL REPORT: संदेरी धरणाची भिंत धोकादायक, दुर्घटना घडली तर जबाबदार कोण?)

Loading...

(पाहा : VIDEO: मुंबईत हवामान विभागाकडून हाय अलर्ट, 'या' दिवशी मुसळ'धार')

यापूर्वी 3 दहशतवाद्यांचा खात्मा

दरम्यान, यापूर्वी जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ तीन दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न जवानांनी हाणून पाडला. मंगळवारी (30 जुलै) रात्री उशिरा ही घटना घडली. शोधमोहिमेदरम्यान आपल्या शूर जवानांनी या तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला.

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षेसाठी पाठवणार अतिरिक्त फौजफाटा

दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये अतिरिक्त 25,000 जवानांची फौज पाठवण्यात येणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. पॅरामिलिट्री फोर्सला काश्मीर खोऱ्यात अतिरिक्त सैनिकांचा फौजफाटा पाठवण्याचे आदेश केंद्र सरकारनं जारी केले आहेत.

SPECIAL REPORT: भाजपचा 'शो' हाऊसफुल्ल, मेगाभरती बंद करण्याची वेळ!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 2, 2019 11:27 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...