S M L

पुलवामात CRPFच्या चौकीवर ग्रेनेड हल्ला

काही हल्लेखोर आले आणि चौकीवर हल्ला करून पळून गेल्याची माहिती सुरक्षा दलाने दिलीय.

News18 Lokmat | Updated On: May 21, 2019 10:12 PM IST

पुलवामात CRPFच्या चौकीवर ग्रेनेड हल्ला

श्रीनगर, 21 मे : गेल्या काही महिन्यात जम्मू आणि काश्मीरमधलं पुलवामा सर्व जगभर प्रसिद्धीच्या झोतात आलं. CRPF जवानांच्या वाहनांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर गेल्या तीन महिन्यांमध्ये पुलवामा शांत होतं. मात्र मंगळवारी दहशतवाद्यांनी पुलवामा इथल्या एका CRPF च्या चौकीवर ग्रेनेड हल्ला केला.

काही हल्लेखोर आले आणि चौकीवर हल्ला करून पळून गेल्याची माहिती सुरक्षा दलाने दिलीय. सुदैवानं या हल्ल्यात कुणीही जखमी झाले नाही. हल्लेखोरांचा शोध घेण्याचं काम सुरक्षा दलाने सुरू केलंय. फेब्रुवारी महिन्यातल्या घटनेनंतर या भागातली सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

5 महिन्यात 86 दहशतवाद्यांचा खात्मा


जम्मू आणि काश्मीरमध्ये लष्कराने दहशतवाद्यांविरुद्ध सुरू केलेली धडक मोहीम जोरात सुरू आहे. 2019 मध्ये म्हणजे गेल्या 5 महिन्यात तब्बल 86 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती लष्कराने आज दिली. लष्कराच्या नॉदर्न कमांडचे प्रमुख रणबीर सिंग यांनी ही माहिती दिली. यापुढेही अतिरेक्यांची ही मोहिम सुरूच राहणार असल्याचही त्यांनी सांगितलं.

जम्मू आणि काश्मीरमध्ये लष्कराने दहशतवाद्यांविरुद्ध सर्वच स्तरांमधून मोहिम सुरू केलीय. धडक कारवाई करणं, लोकांमध्ये विश्वास निर्माण करणं आणि दहशतवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणं अशा प्रत्येक पातळीवर ही मोहिम सुरू आहे. 'ऑपरेशन ऑल आऊट' असं नाव या मोहिमेला देण्यात आलंय. गेल्या दोन वर्षांपासून लष्कराची ही मोहिम सुरू आहे. याच कारवाईत 20 जणांना अटकही करण्यात आली असून त्यांच्याकडून महत्त्वाची माहिती मिळी आहे.

या मोहिमेत लष्कराने दहशतवाद्यांची एक हिट लिस्ट तयार केलीय. या यादीतल्या दहशतवाद्यांचा माग घेऊन त्यांना ठार केलं जातं किंवा अटक केली जाते. हे दहशतवादी काही घातपात घडविण्याच्या आधीच त्यांना संपवलं जातं. त्यांनी घातपात घडविल्यावर शोध घेण्यापेक्षा आधीच आक्रमक धोरण स्वीकारलं तर मोठी हानी टाळली जाते असं लष्कराचं मत आहे. पुलवामा हल्ल्याला जबाबदार असलेल्या आणि त्यांना मदत करणाऱ्या सर्वांना लष्कराने कारवाई करत महिनाभरातच यमसदनी पाठवलं होतं. लष्कर ही यादी सातत्याने अपडेटही करत असते.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 21, 2019 10:12 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close