Jammu-Kashmir: दहशतवाद्यांचा सुरक्षा दलावर ग्रेनेड हल्ला, 12 नागरिक जखमी

Jammu-Kashmir: दहशतवाद्यांचा सुरक्षा दलावर ग्रेनेड हल्ला, 12 नागरिक जखमी

दहशतवाद्यांचा नेम चुकला आणि ग्रेनेडचा स्फोट हा रस्त्यावरच झाला. त्यामुळे हे नागरिक जखमी झाल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

  • Share this:

श्रीनगर 18 नोव्हेंबर: जम्मू-कश्मीर (Jammu-Kashmir) च्या काकापोरा भागात दहशतवाद्यांनी सीआरपीएफ (CRPF) आणि पोलिसांच्या संयुक्त पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात 12 नागरिक जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांचा नेम चुकला आणि ग्रेनेडचा स्फोट हा रस्त्यावरच झाला. त्यामुळे हे नागरिक जखमी झाल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. या नागरिकांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहितीही पोलिसांनी दिलीय.

या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला असून दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे. सोमवारीही दहशतवाद्यांनी एका पोलीस चौकीवर हल्ला केला होता. मात्र त्यात कुणीही जखमी झालेलं नव्हतं.

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानही शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार करतो आहे. 15 नोव्हेंबरला पाकिस्तानकडून (Pakistani Army) जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) नियंत्रण रेषेजवळील अनेक सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला. यात मोठी जीवितहानी झाली होती. जम्मू-काश्मीरच्या गुरेज आणि उरी सेक्टरदरम्यान, नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं, ज्यात पाच सुरक्षारक्षकांसह 11 लोकांचा मृत्यू झाला होता.

भारतीय सेनेनेही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं. भारतीय सेनेने केलेल्या कारवाईत पाकिस्तानलाही मोठं नुकसान झालं आहे. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात सेनेतील चार जवान आणि सीमा सुरक्षादलातील एक जवान शहीद झाले आहेत. तर सहा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. बीएसएफचे महानिरिक्षक राजेश मिश्रा यांनी सांगितलं की, पाकिस्तानने गोळीबार केला, त्याला भारतीय जवानांनीही प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तानच्या अनेक सुरक्षा चौक्या उद्धस्त करण्यात आल्या आहेत.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 18, 2020, 9:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading