मराठी बातम्या /बातम्या /देश /

Jammu Kashmir: कुलगाममध्ये पुन्हा काश्मिरी पंडिताची हत्या, दहशतवाद्यांनी शाळेत घुसून महिला शिक्षिकेवर झाडल्या गोळ्या

Jammu Kashmir: कुलगाममध्ये पुन्हा काश्मिरी पंडिताची हत्या, दहशतवाद्यांनी शाळेत घुसून महिला शिक्षिकेवर झाडल्या गोळ्या

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

जम्मू काश्मीरमध्ये आणखी एका काश्मिरी पंडिताची हत्या करण्यात आली आहे. शाळेत घुसून महिला शिक्षिकेवर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या आहेत.

  • Published by:  Sunil Desale

श्रीनगर, 31 मे : जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir) येथील कुलगाममध्ये काश्मिरी पंडिताची हत्या करण्यात आली आहे. दहशतवाद्यांनी कुलगाममधील गोपालपोरा भागात असलेल्या हायस्कूलमध्ये घुसून महिला शिक्षिकेवर गोळीबार केला. या घटनेत महिला शिक्षिका गंभीर जखमी झाली. शिक्षिकेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान शिक्षिकेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. (Terrorist fired on woman teacher in Kulgaon Jammu Kashmir)

या घटनेनंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला घेरलं असून दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे. शाळेत घुसून शिक्षिकेवर गोळ्या झाडण्यात आल्याच्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा भ्याड कृत्य केलं आहे. काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील टीव्ही अभिनेत्री अमरिना यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर आता शाळेत घुसून महिला शिक्षिकेवर गोळ्या झाडल्या आहेत.

मृतक महिला शिक्षिकेचं नाव रजनी असल्याची माहिती समोर आली आहे. रजनी या सांबा येथील निवासी होत्या आणि कुलगाम गोपालपोरा भागात असलेल्या हायस्कूलमध्ये शिक्षिकेचं काम करत होत्या.

काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरमधील बडगाममधील राजस्व विभागातील एका अधिकाऱ्याची गोळी घालून हत्या करण्यात आली होती. तहसीलदार कार्यालयातील राहुल भट्ट नावाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांनी हत्या केली. राहुल हे काश्मिरी पंडीत असल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवाद्यांनी तहसीलदार कार्यालयात घुसून गोळीबार केला. यानंतर दहशतवादी घटनास्थळाहून फरार झाले. त्यांचा तपास सुरू आहे. सैन्यानेही या भागात सर्च ऑपरेशन सुरू केलं होतं.

राहुल यांच्या हत्येचा भारतीय सैन्याने घेतला बदला

जम्मू आणि काश्मीरच्या बांदीपोरामध्ये शुक्रवारी (13 मे) लष्कराने 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला. लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या या चकमकीत लष्कराने बेरार भागात दोन दहशतवादी ठार झाले. हे दोन्ही दहशतवादी काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांच्या हत्येत सामील होते, असंही सूत्रांच्या हवाल्यानं वृत्त आहे.

राहुल यांचे मारेकरी यापूर्वीही अनेक दहशतवादी घटनांमध्ये सामील होते. फैसल उर्फ ​​सिकंदर आणि अबू उकासा अशी ठार झालेल्या दोन्ही पाकिस्तानी दहशतवाद्यांची नावे आहेत. या दोन दहशतवाद्यांपैकी एक फैसल हा यापूर्वी 10 डिसेंबर 2021 आणि 11 फेब्रुवारी 2022 रोजी बांदीपोरा येथील गुलशन चौक आणि निशात पार्क येथे दहशतवादी हैदरसह 3 पोलिसांच्या हत्येत सामील होता. या दहशतवाद्यांनी मध्य काश्मीर आणि दक्षिण काश्मीरमधील आपले लपण्याचे ठिकाण बदलले होते. यासोबतच इतर दहशतवादी कारवायांमध्येही हे लोक सहभागी होते.

First published:

Tags: Jammu kashmir, Terrorist