भारतीय जवानांची कौतुकास्पद कामगिरी; दहशतवाद्याचं झालं मन परिवर्तन!

भारतीय जवानांची कौतुकास्पद कामगिरी; दहशतवाद्याचं झालं मन परिवर्तन!

भारतीय सैन्यानं केलेलं कृत्य पाहून आता दहशतवाद्यानं सैन्यात भरती व्हायला हवं होतं अशी प्रतिक्रिया दिली आहे.

  • Share this:

श्रीनगर, 30 जून : दहशतवाद्यांमध्ये दिवसेंदिवस मतभेद वाढत आहेत. त्याची प्रचिती पुन्हा एकदा आली कारण, दहशतवाद्यांनी आपल्या साथीदारावर गोळीबार करून पळ काढला. त्यानंतर जखमी दहशतवादी पेट्रोलिंग करणाऱ्या भारतीय लष्कराच्या निदर्शनास आला. या जखमी दहशतवाद्याला भारतीय सैन्यानं तात्काळ रूग्णालयात दाखल करत त्याच्यावर उपचार केले. भारतीय सैन्यानं उचललेलं पाऊल पाहून दहशतवाद्याला देखील भरून आलं. यावेळी त्यानं भारतीय सैन्याचे आभार मानले. शिवाय, मला देखील तुमच्याप्रमाणे सैन्यात भरती व्हायला हवं अशी प्रतिक्रिया दिली.

नेमकं काय झालं?

आरिफ हुसैन बट असं या दहशतवाद्याचं नाव आहे. भारतीय सैन्यावर हल्ला करण्याबाबत दहशतवाद्यांनी प्लॅन केला. त्यानंतर आपला मित्र आदिल अहमदसोबत कॅपवर आरिफ परतत होता तेव्हा दहशतवाद्यांच्या दुसऱ्या गटानं त्यांना घेरलं आणि गोळीबार केला. जखमी अवस्थेमध्ये आरिफला सोडून इतर दहशतवाद्यांनी पळ काढला. ज्यावेळी पेट्रोलिंगदरम्यान जखमी अवस्थेतील आरिफ भारतीय सैन्याला दिसला तेव्हा त्यांनी त्याला रूग्णालयात भरती करत त्याच्यावर उपचार केले. भारतीय सैनिकांचं हे रूप पाहून आरिफनं मला देखील तुमच्या प्रमाणे सैनिक व्हायला हवं होतं अशी प्रतिक्रिया दिली आहे. उपचारानंतर आरिफ दहशतवादाचा मार्ग स्वीकारणाऱ्या तरूणांना सावध करणार आहे. त्यांना रोखणार आहे.

अरेरे... सहावी पत्नी 271 कोटींसह गायब!

काश्मिरात दहशतवाद्यांमध्ये फूट

जम्मू – काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया वाढत आहेत. पण, आता घाटीमध्ये सक्रीय असलेल्या दहशतवादी गटांमध्ये फूट पडताना दिसत आहे. दहशतवादी गटांची विचारधारा ही वेगवेगळी आहे. त्यामुळे हेच दहशतवादी परस्परांच्या जीवावर उठले असल्याचं दिसून येत आहे. इंटेलिजन्सनं दिलेल्या माहितीनुसार काश्मीरमध्ये प्रो इस्लामी आणि प्रो पाकिस्तानी दहशतवादी गट परस्परांविरोधात लढताना दिसत आहेत.

ब्रेकअपचा बदला, प्रेयसीवर केले 12 वार आणि स्वत:चाही चिरला गळा!

First published: June 30, 2019, 12:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading