Home /News /national /

BREAKING : सुरक्षा दल आणि पोलिसांवर दहशतवाद्यांचा हल्ला, जवान आणि नागरिक जखमी

BREAKING : सुरक्षा दल आणि पोलिसांवर दहशतवाद्यांचा हल्ला, जवान आणि नागरिक जखमी

अलमगिरी बाजार परिसरात दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. दहशतवाद्यांनी पोलिस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकावर हल्ला करून लक्ष्य केलं आहे.

    श्रीनगर, 06 डिसेंबर : दहशतवाद्यांच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहे. जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर परिसरात सुरक्षा दल आणि पोलिसांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. ही घटना श्रीनगरच्या हवल सजगीरपोरा परिसरात घडली आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी आणि नागरिक जखमी आहे. पोलीस कर्मचारी आणि नागरिकाला तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी श्रीनगरमध्ये सुरक्षा दल आणि पोलीस कर्मचारी यांच्या कुमकवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. सुरक्षा दलानं या परिसराला घेरलं असून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. सुरक्षा दल आणि पोलीस यांना एकत्र दहशतवाद्यांनी यावेळी टार्गेट केलं आणि हल्ला केला. हे वाचा-मुस्लीम समुदायातील एकाहून अधिक लग्नाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान जम्मू काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अलमगिरी बाजार परिसरात दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. दहशतवाद्यांनी पोलिस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकावर हल्ला करून लक्ष्य केले. फारूख अहमद असं जखमी झालेल्या पोलीस जवानाचं नाव आहे तर दुसरा नागरिक असून दोघांनाही जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांचं सर्च ऑपरेशन जारी आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Jammu and kashmir, Terror acttack

    पुढील बातम्या