मराठी बातम्या /बातम्या /देश /

जम्मूमध्ये दहशतवादी हल्ल्यात तीन जवान शहीद, दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मूमध्ये दहशतवादी हल्ल्यात तीन जवान शहीद, दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Terrorist Attack: लष्कराच्या छावणीजवळ रात्री उशिरा काही हालचाल दिसली. त्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. दहशतवाद्यांना हल्ल्याला भारतीय जवानांनी देखील चोख प्रत्युत्तर दिलं.

    जम्मू-काश्मीर, 11 ऑगस्ट : जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये दहशतवादी हल्ल्यात तीन भारतीय जवान शहीद झाले आहेत. भारतीयजवानांनी चोख प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. दहशतवादी राजौरीतील लष्कराच्या कॅम्पमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते. लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक अजूनही सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराच्या छावणीजवळ रात्री उशिरा काही हालचाल दिसली. त्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. दहशतवाद्यांना हल्ल्याला भारतीय जवानांनी देखील चोख प्रत्युत्तर दिलं. यादरम्यान लष्कराने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून शोधमोहीम सुरू आहे. दहशतवादी छावणीत घुसण्याचा प्रयत्न करत होते मात्र ते कॅम्पमध्ये प्रवेश करू शकले नाहीत. राजौरीतील दारहाल भागातील परगलमध्ये हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. स्वातंत्र्य दिनापूर्वी काश्मीरमध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याची योजना आखण्यात आली होती. राजौरीतील दारहाल भागातील परगलमध्ये दहशतवादी लष्कराच्या छावणीचे कुंपण ओलांडत होते. त्यावेळी लष्कराच्या जवानांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. दरम्यान दोन्ही बाजून गोळीबार सुरु झाला. जम्मूचे एडीजीपी मुकेश सिंह यांनी सांगितले की, दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले आहेत. या भागात आणखी काही दहशतवादी लपून बसले असण्याची शक्यता आहे, त्यामुळे दारहाल पोलिस स्टेशनपासून 6 किमी अंतरापर्यंत सुरक्षा दलाच्या अनेक तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Jammu and kashmir, Terrorist attack

    पुढील बातम्या