ऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा!

ऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा!

सचिवालयाच्या इमारतीवर केवळ भारताचा तिरंगा (National Flag) फडकताना दिसेल.

  • Share this:

श्रीनगर, 25 ऑगस्ट: जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir)ला विशेष अधिकार देणारे कलम 370 (Article 370)हटवल्यानंतर दोन केंद्रशासित प्रदेशा(Union Territory)ची निर्मिती करण्यात आली. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे पाकिस्तानला झटका बसला. केंद्र सरकारच्या या निर्णयाची अंमलबजावणी हळूहळू केली जात आहे. यापैकी एक सर्वात महत्त्वाचा म्हणजे काश्मीरमध्ये फक्त भारतीय तिरंगा फडकावण्याचा होय. श्रीनगर(Srinagar)मधील सचिवालया(Civil Secretariat)च्या इमारतीवरून जम्मू-काश्मीर राज्याचा असलेला स्वतंत्र झेंडा आता हटवण्यात आला आहे. आता सचिवालयाच्या इमारतीवर केवळ भारताचा तिरंगा (National Flag) फडकताना दिसेल.

जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम 370 आणि कलम 35 A(Article 370 & 35A) हटवल्यानंतर श्रीनगरच्या सचिवालयाच्या इमारतीवरून राज्याचा झेंडा हटवण्यात आला आहे. याआधी राज्यात दोन ध्वज फडकावले जात होते. तिरंग्यासोबत जम्मू्-काश्मीरचा स्वतंत्र झेंडा देखील फडकावला जात होता. पण हा स्वतंत्र झेंडा आता इतिहास जमा होणार आहे. जम्मू-काश्मीर राज्याच्या ध्वज लाल रंगाचा होता त्यावर काश्मीर खोरे(Kashmir Valley), जम्मू (Jammu)आणि लडाख(Ladakh) या भागातील प्रतिबिंब होते. हा ध्वज राज्याची वेगळी ओळख सांगत होता. 1952मध्ये जम्मू्-काश्मीर राज्याच्या संविधान सभेने हा ध्वज स्विकारला होता.

Indian national flag and the flag of Indian-Administered Kashmir flutter on the roof of civil secretariat in Srinagar. The Indian national flag (L) and the flag of Indian-Administered Kashmir (IAK) flutter on the roof of the civil secretariat during its reopening in the traditional "Darbar Move" ceremony in Srinagar May 9, 2005. The civil secretariat which houses the office of the Chief Minister and his colleagues reopened in Srinagar, the summer capital of IAK, after a gap of six months in Jammu, the winter capital of IAK. "Darbar Move" is the age-old tradition of shifting the civil secretariat and other government offices to Jammu during winter months and reopening in Srinagar for six summer months. REUTERS/Fayaz Kabli - RP6DRMSOZMAA

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच मोदी सरकारने कलम 370 रद्द केले आणि जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतला. त्याच बरोबर मोदी सरकारने राज्याचे विभाजन करून जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन भाग केले. या निर्णयानंतर राज्यात हिंसाचार किंवा चुकीच्या गोष्टी घडू नयेत म्हणून काश्मीर खोऱ्यात अनेक गोष्टींवर बंदी घालण्यात आली होती. यात मोबाईल, टेलिफोन, इंटरनेटचा देखील समावेश होता. त्याच बरोबर शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती. अर्थात कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत झाल्यानंतर बंदी हटवण्यात आली. काश्मीरमध्ये अद्यापही अतिरिक्त जवान तैनात आहेत. राज्यात सलग 21 दिवस दुकान, अन्य व्यवसाय बंद होते.

शाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT

Published by: Akshay Shitole
First published: August 25, 2019, 9:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading