Home /News /national /

जम्मू-काश्मीरला मिळाले 'न्यू ईयर गिफ्ट', सुरू झाली SMS आणि इंटरनेट सेवा

जम्मू-काश्मीरला मिळाले 'न्यू ईयर गिफ्ट', सुरू झाली SMS आणि इंटरनेट सेवा

काश्मीर खोऱ्यात मंगळवारी मध्यरात्रीपासून SMS सुविधा सुरू करण्यात आली आहे. तसेच सर्व शाळा, महाविद्यालये आणि हॉस्पिटल्समध्ये इंटरनेट सेवा (Internet Service) सुरू करण्यात आली आहे.

    श्रीनगर,1 जानेवारी: जम्मू-काश्मीरला (Jammu-Kashmir) सरकारने 'न्यू ईयर गिफ्ट' दिले आहे. काश्मीर खोऱ्यात मंगळवारी मध्यरात्रीपासून SMS सुविधा सुरू करण्यात आली आहे. तसेच सर्व शाळा, महाविद्यालये आणि हॉस्पिटल्समध्ये इंटरनेट सेवा (Internet Service) सुरू करण्यात आली आहे. 5 ऑगस्टला कलम 370 (आर्टिकल 370) हटवल्यानंतर काश्मीर खोऱ्यात लॅंडलाइन, इंटरनेट आणि शॉर्ट मेसेज सर्व्हिस (एसएमएस) बंद करण्यात आली होती. दरम्यान, परिस्थिती सामान्य झाल्यानंतर हळूहळू काही भागातील प्रतिबंध हटवण्यात आले होते. आता नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जम्मू-काश्मीरमध्ये SMS आणि इंटरनेट सर्व्हिसही सुरू करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव रोहित कंसल यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, 'सर्व शासकीय रुग्णालयात 31 डिसेंबर 2019 च्या मध्यरात्रीपासून इंटरनेट सेवा आणि सर्व मोबाइल फोनवर एसएमएस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आली आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. शासकीय रुग्णालयांसोबत शाळा, महाविद्यालयातही ब्रॉडबॅंड सेवा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. दुसरीकडे, कैद करण्यात आलेल्या नेत्यांची सुटका करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेईल, अशी माहिती रोहित कंसल यांनी दिली आहे. दरम्यान, काश्मीरमध्ये कलम 370 हटवण्यात आल्यानंतर सर्व एसएमएस आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. परिणामी काश्मीरमधील जनतेला अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Article 370, Jammu kashmir, Jammu kashmir news

    पुढील बातम्या