जम्मू-काश्मीर : अनंतगानमध्ये जवानांची कारवाई, 6 दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीर : अनंतगानमध्ये जवानांची कारवाई, 6 दहशतवाद्यांचा खात्मा

सोमवारीही जम्मू-काश्मीरमध्ये शोपियांमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षादलाने चार दहशतवाद्यांना ठार मारलं होतं.

  • Share this:

23 नोव्हेंबर : जम्मू-काश्मीरमध्ये काश्मीरमध्ये अतिरेक्यांविरूद्ध सुरक्षा दलांनी सुरू केलेल्या ऑपरेशन ऑल आऊट मोहिमेला मोठं यश मिळालंय. अनंतगान जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक उडाली. या चकमकीत ६ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. दहशतवाद्याविरोधात भारतीय सुरक्षा जवानांचं आॅपरेशन अजूनही सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनंतनाग जिल्ह्यातील सेकिपोरा भागात भारतीय सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. आतापर्यंत जवानांनी सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. दहशतवाद्यांकडून शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला.

दरम्यान, अनंतनागमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. सोमवारीही जम्मू-काश्मीरमध्ये शोपियांमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षादलाने चार दहशतवाद्यांना ठार मारलं होतं.

पंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्यात मतदान सुरू होण्याआधी जिल्ह्यातील नदीगाम गावात सुरक्षा दलाला काही दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाचे जवना आणि पोलिसांनी संयुक्तपणे आॅपरेशन सुरू केलं. जवानांनी घेराव घातल्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. जवानांनी प्रत्युत्तर दाखल केलेल्या गोळीबारात ४ दहशतवादी ठार झाले. या गोळीबारात एक जवान शहीद झाला तर इतर २ जण जखमी झाले होते.

(सांकेतिक फोटो)

==================

First published: November 23, 2018, 9:15 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading