जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी सकाळीच भारतीय सैन्य दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. पोलीस आणि सैन्य दलाच्या संयुक्त टीमकडून दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई सुरू आहे. शुक्रवारी सुरक्षा दलाने ड्रोन पाडला शुक्रवारी जम्मू-काश्मीर पोलिसांनी जम्मू जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात पाच किलोग्रॅम स्फोटक सामग्री (आयईडी) घेऊन जाणारं एक ड्रोन पाडलं. यासोबतच दहशतवाद्यांचा हल्ल्याचा डाव हाणून पाडला आहे. पोलिसांनी सांगितले की, गुरुवारी रात्रीच्या सुमारास आंतरराष्ट्रीय सीमेवर कानाचक येथे एक ड्रोन दिसून आला त्यानंतर सुरक्षा दलाने हा संशयास्पद ड्रोन पाडला.Sepoy Krishna Vaidya lost his life during operations on 23rd July 2021 at Krishna Ghati Sector, Jammu and Kashmir: 16 Corps, Indian Army pic.twitter.com/39cVvUIQJ1
— ANI (@ANI) July 24, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Indian army, Jammu and kashmir