युद्धाच्या तणावात पाकिस्तानने केली 'गझनवी' क्षेपणास्त्राची चाचणी!

युद्धाच्या तणावात पाकिस्तानने केली 'गझनवी' क्षेपणास्त्राची चाचणी!

गझनवी पृष्ठभागापासून 290 किलोमीटरपर्यंत मार करण्यास सक्षम आहे. हे क्षेपणास्त्र 700 किलो स्फोटकं घेऊन जाऊ शकतं. कराचीजवळील सोनमियानी फ्लाइट टेस्ट रेंजमध्ये याची चाचणी करण्यात आली.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 ऑगस्ट : जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारा कलम 370 हटवल्यापासून पाकिस्तान भारताला सातत्यानं युद्धाचे इशारे देत आहे. गुरुवारी पाकिस्तानने त्यांच्या 'बॅलेस्टिक क्षेपणास्त्रा'ची यशस्वीरीत्या चाचणी केली. 'गझनवी' असं या क्षेपणास्त्राचं नाव आहे. गझनवी पृष्ठभागापासून 290 किलोमीटरपर्यंत मार करण्यास सक्षम आहे. हे क्षेपणास्त्र 700 किलो स्फोटकं घेऊन जाऊ शकतं. कराचीजवळील सोनमियानी फ्लाइट टेस्ट रेंजमध्ये याची चाचणी करण्यात आली. पाकिस्तानचे नॅशनल डेव्हलपमेंट कॉम्प्लेक्स (NDC) पंजाब (पाकिस्तान) मधील फतेहजंग इथे आहे. इथूनच क्षेपणास्त्रावर नजर ठेवली जाणार आहे.

'गझनवी'ची चाचणी घेण्यासाठी पाकिस्तानने पुढील 3 दिवस कराची हवाई क्षेत्र बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. 28 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान पाकिस्तानने कराची हवाई क्षेत्राचे 3 हवाई मार्ग बंद केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद 370 हटवल्यानंतर पाकिस्तान सतत भारताविरूद्ध मदत शोधत आहे. नेमकी अशाच वेळी 'गझनवी' या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. त्यामुळे पाक भारताला घाबरवण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसतं. या सगळ्यात मात्र, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान नाराज असल्याचं दिसून आलं. पण अशा परिस्थितीतही पाक युद्ध आणि आण्विक हल्ल्याची धमकी देत आहे.

पाकिस्तान लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी ट्वीट केलं आहे की, 'पृष्ठभागापासून मारा करणाऱ्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचं पाकिस्तानने प्रक्षेपण केलं आहे. हे क्षेपणास्त्र 290 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतं.' पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एका आठवड्यापूर्वी न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत अणूहल्ला करू असे संकेत दिले होते. पण दरम्यान, भारतावर दबाव टाकण्यासाठी ही क्षेपणास्त्र चाचणी घेतल्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

युद्धाची धमकी देणाऱ्या पाकिस्तानची वित्तीय तूट पोहोचली २८ वर्षातील सर्वोच्च पातळीला...

जूनमध्ये पाकिस्तानच्या जीडीपीच्या तुलनेत वित्तीय तूट 8.9 टक्क्यांनी वाढली आहे. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यापासून पाकिस्तान भारताला सातत्याने युद्धाचे इशारे देत आहे. पण सद्य परिस्थितीत पाकिस्तानने आपल्या अर्थव्यवस्थेचा विचार केला पाहिजे. कारण, पाकिस्तानची वित्तीय तूट तीन दशकातील सर्वोच्च पातळीला पोहोचली आहे.

इतर बातम्या -  मुंबईत 4 नराधमांनी सामूहिक बलात्कार केलेल्या 'निर्भया'चा मृत्यू; अखेर मृत्यूशी झुंज संपली!

वित्तीय तूट म्हणजे सार्वजनिक खर्च आणि सार्वजनिक उत्पन्न यातील फरक. सरकारच्या एकूण उत्पन्न स्रोतापेक्षा सरकारी खर्च अधिक झाल्यास वित्तीय तूट निर्माण होते. यासगळ्यामुळे काश्मीरच्या मुद्द्यावरून जगात एकट्या पडलेल्या पाकड्यांचा तोल पुरता ढासळला आहे. अमेरिकेा आणि मुस्लीम राष्ट्रांनीही भीक घातली नसल्यानं हतबल झालेल्या इम्रान खानची मजल अणुबॉम्बची धमकी देण्यापर्यंत गेली.

इतर बातम्या - बालकनीत रेलिंग पकडून योगा करत होती तरुणी, 80 फूट खाली कोसळली!

आता पाकिस्तानच्या रेल्वे मंत्र्यांचं इंजिन भारताला युद्धाची धमकी देण्यापर्यंत धडधडलं आहे. शेख रशीद यांनी येत्या ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात भारत-पाकिस्तानात युद्ध होईल, असं भाकित केलं. काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी अंतिम लढ्याची वेळ आल्याची दर्पोक्तीही या महाशयांनी केली आहे. पण भारतावर फक्त दबाव टाकण्यासाठी पाक हे करत असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे.

इतर बातम्या - 'नवसाला पावणारा आणि इच्छापूर्ती करणारा बाप्पा' अशी जाहिरात करताना सावधान...!

भारताचा पाकिस्तानला आणखी एक मोठा झटका, नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानच्या 10 पेक्षा जास्त कमांडोंचा खात्मा

नियंत्रण रेषेजवळ मागच्या तीन आठवडयात भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्याच्या 10 पेक्षा जास्त कमांडोंचा खात्मा केला आहे. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवल्यापासून नियंत्रण रेषेवर आक्रमकता दाखवणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला भारतीय लष्कराने चांगलाच धडा शिकवला आहे. इंडिया टुडेनं यासंबंधी वृत्त दिलं आहे.

VIDEO : ‘फक्त या प्रश्नाचं उत्तर द्या’, राष्ट्रवादी सोडलेल्या साताऱ्याच्या नेत्यांना अमोल कोल्हेंचा बोचरा सवाल

Published by: Renuka Dhaybar
First published: August 29, 2019, 1:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading