गेल्या काही दिवसांपासून सीमेवर पाकिस्तानकडून सतत गोळीबार होत आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील कटुता वाढली आहे. आज ईदच्या दिवशीही पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं गेलं ज्यात बीएसएफचा 21 वर्षीय विकास गुरूगंग हा जवान शहीद झाला. विकास हे मुळचे मणिपुरचे रहिवासी होते. जम्मू-काश्मीर शस्त्रसंधी उल्लंघनाशिवाय इतरही बऱ्याच घटना घडल्या. ज्यामुळे दोन्ही देशांमधील कटुता वाढली आहे. पुलवामात आतंकवादींनी सुट्टीवर जात असलेल्या जवानाचे अपहरण करून त्याची हत्या केली. हेही वाचा पाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, वाघा बॉर्डरवर यावर्षी ईदसाठी मिठाई वाटप नाही तसंच श्रीनगरचे वरीष्ठ पत्रकार आणि ‘रायजिंग कश्मीर’चे संपादक शुजात बुखारी यांची गोळी मारून हत्या केली. दुसरीकडे दिवसेंदिवस सेनेच्या जवानांवर होत असलेल्या पत्थरबाजी दोन्ही देशातील वातावरण तणावपूर्ण आहे. या आधी मंगळवारी पाकिस्तानी सेनेद्वारा केल्या गेलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनामुळे सांबा जिल्ह्याच्या रामगढ सेक्टरमध्ये असिस्टंट कमांडंटसहित बीएसएफचे चार जवान शहीद झाले होते.The operations against the terrorists to resume.
— HMO India (@HMOIndia) 17 June 2018
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ceasefire, Home minister, Jammu kashmir, Rajnath singh, Ramzan, Violence, जम्मू काश्मीर, दहशतवादी, युद्धबंदी, शस्त्रसंधी