दहशतवाद्यांनी रचला होता पुलवामाप्रमाणे हल्ल्याचा प्लॅन

पुलवामाप्रमाणे पुन्हा एकदा भारतीय लष्करावर हल्ल्याचा प्रयत्न दहशतवाद्यांनी केला.

News18 Lokmat | Updated On: Jun 18, 2019 09:44 AM IST

दहशतवाद्यांनी रचला होता पुलवामाप्रमाणे हल्ल्याचा प्लॅन

श्रीनगर, 18 जून : जम्मू – काश्मीरमधील पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या गाडीला लक्ष्य केलं. या हल्ल्याकडे 14 फेब्रुवारीप्रमाणे दहशतवादी हल्ल्याप्रमाणे पाहिलं जात आहे. पण, भारतीय जवान सतर्क असल्यानं दहशतवाद्यांचा हेतू साध्य झाला नाही. दरम्यान, या हल्ल्यामध्ये 6 सैनिक आणि 2 नागरिक जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर जखमी जवानांना सुरक्षितरित्या श्रीनगरच्या रूग्णालयामध्ये हलवण्यात आलं आहे. या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या तिघांची प्रकृती ही गंभीर आहे. 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले होते. त्यावेळी स्फोटकांनी भरलेली गाडी जवानांच्या ताफ्यावर आदळून हल्ला करण्यात आला होता. सोमवारी झालेला हल्ला देखील पुलवामा हल्ल्याप्रमाणे होता. पण, सतर्कतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

रिमोट कंट्रोलचा केला होता वापर

दरम्यान, यावेळी दहशतवाद्यांनी IED ठेवलेली गाडी ही रस्त्याच्या कडेला उभी केली होती. या IEDला दहशतवादी काही अंतरावरून ऑपरेट करत होते. हल्ल्यानंतर IED ठेवलेल्या गाडीचे दोन तुकडे झाले. शिवाय, बॉम्बस्फोटानंतर लगेचच गोळीबार सुरू झाला. या घटनेनंतर परिसरात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.


AN-32 विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला; पण ही आहे समस्या

Loading...

सैनिक सुरक्षित

जवानांच्या गाडीला लक्ष्य करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न यावेळी सफल झाला नाही. या हल्ल्यामध्ये सर्व जवान सुरक्षित आहेत. तर, जखमींवर रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पण, हा हल्ला कुणी केला होता? याबाबत मात्र कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.

40 जवान शहीद

फेब्रुवारीमध्ये दहशतवाद्यांनी आत्मघातकी स्फोटाद्वारे जवानांच्या ताफ्याला लक्ष्य केलं होतं. यामध्ये 40 जवान शहीद झाले होते. यानंतर भारतीय हवाई दलानं एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.


SPECIAL REPORT: FACEBOOK LIVE दोन भावांच्या जीवावर बेतलं, अपघाताने नागपूर हादरलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 18, 2019 09:44 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...