पुलवामा, १५ फेब्रुवारी २०१९- काश्मीरच्या तीन दशकांच्या इतिहासात पुलवामासारखा आत्मघातकी हल्ला झाला नाही. गुरुवारी झालेल्या या आत्मघातकी हल्ल्यामुळे दहशतवादाचं अजून एक भयंकर रूप समोर आलं आहे.आदिल मोहम्मद दार हा पुलवामा येथील काकापोरा गावात राहायचा. ज्या ठिकाणी हा हल्ला झाला, तिथून फक्त १० किमी दूर गुंडीबाग येथे आदिलचं घर आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी २०० स्थानिक युवक दहशतवादी संघटनेत सामील झाले. त्यातला आदिल आत्मघातकी दहशतवादी झाला.
आदिला हा दुसरा आत्मघातकी दहशतवादी आहे. याआधी २००० मध्ये श्रीनगर येथील अफाक शाहने लष्कराच्या १५ कॉर्प हेटक्वार्टरमध्ये याचप्रकारे आत्मघातकी हल्ला केला होता. काश्मीरमध्ये झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात बहुतांशीवेळा आत्मघातकी दहशतवादी हे पाकिस्तानचे असतात. आदिलने हल्ल्याआधी एक व्हिडिओही रेकॉर्ड केला होता. १० मिनिटांच्या हा व्हिडिओ जैशने पुलवामा हल्ल्यानंतर शेअर केला. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात आदिल या संघटनेत सामिल झाला. आदिल व्हिडिओमध्ये म्हणाला की, ‘जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहाल तोपर्यंत मी जन्नतमध्ये गेलो असेन. लाखो मृतदेह पाहूनही काश्मिरी नागरिकांनो तुम्ही जिद्द सोडली नाही याला माझा प्रणाम’
व्हिडिओमध्ये आदिल म्हणतो की, ‘मी गेल्या वर्षी जैशमध्ये सामील झालो आणि आता दिलेलं वचन पूर्ण करण्याची वेळ आली आहे. मला गर्व आहे.. मी इस्लामचा खरा प्रचारक आहे आणि माझं नाव सुवर्ण अक्षरात लिहिलं जाईल. मी जैश-ए-मोहम्मदच्या आत्मघातकी तुकडीत एका खास ध्येयाने सामील झालो होतो.’पोलिसांच्या माहितीनुसार, आदिलने दहावीपर्यंत शिक्षण घेतलं होतं. दहशतवादी होण्याआधी तो एका मीलमध्ये काम करायचा. पुलवामा दहशतवादी हल्ल्याआधी तो कोणत्याही दहशतवाही हल्ल्यात सामील झाला नव्हता. याचमुळे पोलिसांनी त्याचं नाव C- category militant मध्ये ठेवलं होतं.
१२ वीमध्ये त्याला कॉलेजमधून काढण्यात आलं होतं. यानंतर तो जवळच्याच एका मीलमध्ये काम करत होता. गेल्या वर्षी मार्च महिन्यात त्याने घर सोडलं आणि दहशतवादी संघटनांना सामील झाला. त्याचे वडील गुलाम हसन दार हे वेंडर आहेत.
रिपोर्ट्सनुसार, आदिलने १९ मार्च २०१८ मध्ये घर सोडलं आणि त्यानंतर घरी कधीच गेला नाही. कश्मीर विद्यापीठातून जियोलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणारा त्याचा मित्र समीर अहमदही त्याच दिवसापासून बेपत्ता आहे.
आदिलच्या कुटुंबियांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली. पण काही दिवसांनी पोलिसांनी त्याचा शोध थांबवला. सोशल मीडियावर AK-47 हातात घेणारा त्याचा एक फोटो व्हायरल होत होता. त्याला वकास कमांडो असं नाव देण्यात आलं होतं.
आदिलचे वडील इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हणाले की, ‘घर सोडल्यानंतर तो फक्त एकदाच आम्हाला भेटला होता. त्याचा चुलत भाऊही दहशतवादी होता. आदिल जैश-ए-मोहम्मद संघटनेत सामील होण्याच्या ११ दिवस आधीच तो मारला गेला होता.’
कुटुंबाच्या मते, २०१६ मध्ये हिज्बुल मुजाहिद्दीनचा जहशतवादी बुरहान वानीला मारल्यानंतर काश्मिरमध्ये अनेकदा विरोध करणारी प्रदर्शन निघाली. या प्रदर्शनामध्ये आदिलही सामील झाला होता. यावेळी त्याच्या पायाला गोळी लागली होती.
दारला आदिल अहमद गाडी टकरानेवाला आणि वकास कमांडो ही दोन नावं देण्यात आली होती. स्थानिक लोकांच्या मते, आदिलने त्याचा चुलत भावाला चकमकीत ठार मारण्याच्या घटनेनंतर शिक्षण सोडून दिलं.
स्थानिक पोलिसांच्या मते, आदिल २०० किलो स्फोटक पदार्थांनी भरलेली गाडी घेऊ रस्त्याच्याविरुद्ध दिशेने जवानांच्या गाडीजवळ आला आणि तिथेच त्याने आत्मघातकी हल्ला केला. जैश-ए-मोहम्मदच्या दाव्यानुसार, आदिलकडे ३५० किलोचं स्फोटक सामान होतं.
गेल्यावर्षी दोन स्थानिक आत्मघातकी दहशतवाद्यांनी लेठपोरा येथे सीआरपीएफच्या कॅम्पला उडवले होते. यात ४ जवान शहीद झाले होते. यात एक इन्स्पेक्टरही शहीद झाले. या हल्ल्यात एका जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.
VIDEO : पुलवामा हल्ल्यातील शहिदांबद्दल सांगताना News18India च्या अँकरला अश्रू अनावर