अतिरेक्यांच्या धमक्यांना भीक घालणार नाही - पंतप्रधान मोदी

पंतप्रधनांच्या दौऱ्यानिमित्त श्रीनगरमध्ये गेली दोन दिवस अतिशय कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.

News18 Lokmat | Updated On: Feb 3, 2019 07:56 PM IST

अतिरेक्यांच्या धमक्यांना भीक घालणार नाही - पंतप्रधान मोदी

मुफ्ती इस्लाह श्रीनगर 03 फेब्रुवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी जम्मू आणि काश्मिरच्या दौऱ्यावर होते. दिवसभरात त्यांनी राज्याच्या विविध भागात तीन कार्यक्रम केले. जम्मूत जाहीर सभा, लेहमध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन आणि श्रीनगरमध्ये दल लेकची सफर अशा विविध कार्यक्रमात सहभागी होत त्यांनी काश्मिरमध्ये राजकीय आणि विकासाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पहिला कार्यक्रम हा जम्मूमध्ये झाला. इथं झालेल्या जाहीर सभेत त्यांनी कश्मिरी पंडितांबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. काश्मिरी पंडितांना त्यांच्या मूळ गावी परत जाण्यासाठी सरकार मदत करेल असं त्यांनी सांगितलं. तर विस्थापितांच्या मदतीसाठी सरकार आणखी प्रयत्न करेल असं आश्वासनही त्यांनी दिलं.

नंतर पंतप्रधानांनी लेह इथल्या विविध विकास कामांचं उद्घाटन केलं. पंतप्रधान म्हणाले, ''गेली अनेक दशकं इथली विकासकामे रखडली आहे. आज इथल्या विमानतळाच्या भुमिपूजनाल मी आलो आणि उद्घाटनालाही येणार आहे.'' त्यांनी आपल्या भाषणाची सुरूवात तिथल्या स्थानिक भाषेतून केली.

लेह आणि लद्दाख या भागात लोकसभेची एक जागा असून ती जागा भाजपकडेच आहे. लोकसभेच्या प्रचाराचीही सुरुवात त्यांनी याच कार्यक्रमामधून केली. भुमिपूजन केलं आता उद्घाटनालाही येणार असं सांगत त्यांनी 2019 मध्ये भाजपचीच सत्ता येणार असा संदेश दिला.

श्रीनगरमध्ये पंतप्रधनांनी जगप्रसिद्ध दल लेक ला भेट देऊन बोटीतून फेरफटकाही मारला. श्रीनगरमध्ये सध्या कडाक्याची थंडी असून तापमान शुन्याच्याही खाली आहे. अशा वातावरणात त्यांनी दल लेकची सफर केली.

Loading...

या दौऱ्यातून त्यांनी काश्मिरमध्ये शांतता आहे असा संदेश देण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. त्याचबरोबर अतिरेक्यांना आम्ही घाबरत नाही हेही दाखवून देण्याचा प्रयत्न केला.

पंतप्रधनांच्या दौऱ्यानिमित्त श्रीनगरमध्ये गेली दोन दिवस अतिशय कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. ही पाच स्तरीय सुरक्षा व्यवस्था असून कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही याची सरकारने काळजी घेतली होती.

श्रीनगरमध्ये झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी नझीर अहमद वाणी यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाहीची आठवण केली. त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सर्वोच्च अशा अशोक चक्राने सन्मानित करण्यात आलं होतं.बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 3, 2019 07:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...