• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • घुसखोरी करणारा ड्रोन जम्मू काश्मीर पोलिसांनी पाडला, सापडले IED आणि 2 GPS; मोठा घातपात घडवण्याचा डाव?

घुसखोरी करणारा ड्रोन जम्मू काश्मीर पोलिसांनी पाडला, सापडले IED आणि 2 GPS; मोठा घातपात घडवण्याचा डाव?

जम्मू काश्मीर पोलिसांनी घुसखोरी करणारा एक ड्रोन पाडला असून त्याच्या फॉरेन्सिक चाचणीतून (Forensic test) काही धक्कादायक निष्कर्ष पुढे आले आहेत.

 • Share this:
  श्रीनगर, 23 जुलै : जम्मू काश्मीर परिसरात (Jammu and Kashmir) ड्रोनचा (Drone) वापर करून होणारे हल्ले, घुसखोरी आणि पाळत ठेवण्याचे प्रकार वाढत चालले आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी घुसखोरी करणारा एक ड्रोन पाडला असून त्याच्या फॉरेन्सिक चाचणीतून (Forensic test) काही धक्कादायक निष्कर्ष पुढे आले आहेत. अत्यंत नियोजनबद्धरित्या IED लावलेला हा ड्रोन काश्मीरमध्ये घुसखोरी करत होता. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. काय आढळलं चाचणीमध्ये? काश्मीरमध्ये घुसखोरी करू पाहणारा हा ड्रोन पाडल्यानंतर त्याची फॉरेन्सिक चाचणी करण्यात आली. त्यामध्ये या ड्रोनवर दोन जीपीएस यंत्रणा लावण्यात आल्याचं दिसून आलं. एक यंत्रणा निकामी झाली तरी टार्गेट चुकू नये, याची खबरदारी म्हणून दोन जीपीएस यंत्रणा बसवल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. हा ड्रोन हेक्सावेअर प्रकारातील असून टार्गेटवर स्फोटकं टाकून पुन्हा आपल्या मूळ ठिकाणी परतण्याची यंत्रणा त्यात कार्यान्वित करण्यात आली होती. हेक्स टेक्नॉलॉजी हाँगकाँग असं नाव या ड्रोनवर असल्याचंही दिसून आलं आहे. हा ड्रोन जास्तीत जास्त 26 किलो वजन वाहून नेऊ शकतो, हे दिसून आलं आहे. त्याची फ्रेम 10 किलोची आणि बॅटरी 10 किलोची आहे. त्यामुळे स्वतःच्या वजनाव्यतिरिक्त 6 किलो वजन या ड्रोनवरून पाठवता येतं. हा ड्रोन 20 किलोमीटर परिसरात कुठल्याही दिशेनं सोडता येतो आणि तो 60 किलोमीटर प्रति तास या वेगानं प्रवास करू शकतो, असं फॉरेन्सिक तज्ज्ञांनी सांगितलं आहे. हे वाचा -दोन मोठ्या बँकांच्या खासगीकरणाच्या हालचाली सुरू; ग्राहकांवर काय होणार परिणाम? एका वेळी सलग 40 मिनिटं उड्डाण करण्याची या ड्रोनची क्षमता असल्याचंही दिसून आलं आहे. तसंच आतापर्यंत या ड्रोननं या मार्गावरून 14 तासांचा प्रवास केल्याची नोंदही झाली आहे. याचाच अर्थ हा ड्रोन यापूर्वी 15 वेळा या भागात येऊन गेला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी हा ड्रोन पाडल्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याची चर्चा आहे.
  Published by:desk news
  First published: