काश्मीरमध्ये LOC जवळ आलं पाकिस्तानचं लढाऊ विमान, Indian Army हाय अलर्टवर

काश्मीरमध्ये LOC जवळ आलं पाकिस्तानचं लढाऊ विमान, Indian Army हाय अलर्टवर

सुरक्षा दलाने केलेल्या धडक कारवाईमध्ये गेल्या वर्षभरात 200 पेक्षा जास्त दहशवादी ठार झाले होते. तर आपल्या काही जवान आणि अधिकाऱ्यांनाही शहीद व्हावं लागलं.

  • Share this:

श्रीनगर 30 नोव्हेंबर: काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) नियंत्रण रेषेजवळ (LoC) पाकिस्तानचे (Pakistan) ड्रोन्स अनेकदा दिसून आले आहेत. मात्र आज पाकिस्तानचं लढाऊ विमान सीमेजवळ दिसल्याने खळबळ उडाली आहे अशी माहिती लष्करी सूत्रांनी दिलीय आहे. हे विमान चुकून आलं की जाणिवपूर्वक आलं होतं याची माहिती आता लष्कर घेत आहे. सोमवारी सकाळी हे विमान दिसलं आहे. त्या विमानाने सीमा रेषेचा भंग केला नसला तरी ते सीमारेषे जवळ आल्याने हा गंभीर प्रकार समजला जातो.

नियंत्रण रेषेजवळ तैनात असलेल्या जवानांना या विमानांचा आवाज आला आणि धूरही दिसला. त्यानंतर अलर्ट झालेल्या लष्कराने त्या घटनेचा अभ्यास सुरू केला आहे. हे विमान प्रशिक्षण देणारं होतं की तैनात केलेलं होतं, त्यावर काही हेरगिरीची उपकरणं होती का या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आता केला जात आहे.

गेल्या काही महिन्यांंपासून काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानने ड्रोनच्या माध्यमातून शस्त्रपुरवढा केल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. त्याच बरोबर त्याम माध्यमातून ड्रग्जची तस्करीही केली जात होती.

काश्मीरमधल्या दहशतवाद्यांना पाकिस्तान मदत करतो ही बाब आता काही नवीन राहिलेली नाही. या दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणं, आर्थिक मदत करणं आणि शस्त्र पुरवठा करण्याचं काम पाकिस्तान गेली कित्येक दशके करत आहे. पाकिस्तानचा एक आणखी डाव भारतीय सुरक्षा दलांनी उधळून लावला आहे. ड्रोनच्या माध्यमातून पाकिस्तान काश्मीरातल्या दहशतवाद्यांना शस्त्र पुरवठा करतो हे स्पष्ट झालं असून लष्कर ए तोयबाच्या 3 दहशतवाद्यांना दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती.

तुमच्यापर्यंत कशी पोहोचणार CORONA VACCINE? एका क्लिकवर पाहा मोदी सरकारचा प्लॅन

सुरक्षा दलाने केलेल्या धडक कारवाईमध्ये गेल्या वर्षभरात 200 पेक्षा जास्त दहशवादी ठार झाले होते. तर आपल्या काही जवान आणि अधिकाऱ्यांनाही शहीद व्हावं लागलं.

या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठाही जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पाकिस्तानमधून या दहशतवाद्यांना राजौरी जिल्ह्यातल्या दुर्गम भागात ड्रोनच्या माध्यमातून शस्त्रे पाठविण्यात आली होती. ती शस्त्रे आणण्यासाठी हे दहशतवादी निघाले होते त्यांना अटक करण्यात आली होती.

गेल्या काही दिवसांपासून सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरुद्ध धडक मोहिम सुरू केली आहे. त्यामुळे राज्यात सातत्याने चकमकी घडत आहेत. हिवाळ्याच्या आधी दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये घुसविण्याचाही पाकिस्तानचा डाव आहे. सुरक्षा दलांना नुकताच पाकिस्तानने सीमेवर खोदलेलं एक भुयारही सापडलं होतं. चिनी इंजिनिअर्सच्या मदतीने हे भुयार खोदण्यात आलं होतं. दहशतवाद्यांना भारतात पाठविण्यासाठी आणि त्यांना पुन्हा परत पळून जाण्यासाठी या भुयाराचा उपयोग करण्याचा डाव उघडकीस आला होता.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 30, 2020, 5:09 PM IST

ताज्या बातम्या