जम्मू काश्मीर : जवानांनी चकमकीत एका दहशतवाद्याचा केला खात्मा

जम्मू काश्मीर : जवानांनी चकमकीत एका दहशतवाद्याचा केला खात्मा

जम्मू-काश्मीरमधील बारमुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे भारतीय जवानांनी एका दहशतावाद्याचा खात्मा केला आहे.

  • Share this:

श्रीनगर, 20 एप्रिल : जम्मू-काश्मीरमधील बारमुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे जवानांनी एका दहशतावाद्याचा खात्मा केला आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, आणखी एका दहशतवाद्याला जवानांनी घेराव घातला असून परिसरात शोधमोहीम सुरू आहे.

शनिवार (20 एप्रिल) पहाटेच्या सुमारासच जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. प्रत्युत्तराच्या कारवाईत जवानांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातलं. घटनास्थळावरून एक पिस्तुल आणि तीन ग्रेनेड ताब्यात घेण्यात आले आहेत.

यापूर्वी 13 एप्रिलला शोपियांमधील गहंड परिसरात झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं होतं.

दरम्यान, जानेवारी महिन्यापासून सुरक्षा दलाकडून जम्मू काश्मीरमध्ये ऑपरेशन ऑलआउट तीव्र स्वरुपात राबण्यात येत आहे. या अंतर्गत मार्च अखेरपर्यंत 60 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. ठार करण्यात आलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांची संख्या जास्त आहे.

वाचा अन्य बातम्या

VIDEO: माझा 9 वर्ष छळ केला त्याबद्दल माफी मागणार का? साध्वी प्रज्ञांचा प्रश्न

सलमान खानचा 'या' सिनेमानं बदललं निर्माता करण जोहरचं आयुष्य

अर्ध्यावरती डाव मोडला! लग्नापूर्वीच नवदेवाची आत्महत्या

VIDEO : प्रकाश आंबेडकरांची राज ठाकरेंवर सडकून टीका, म्हणाले...

First published: April 20, 2019, 11:47 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading