जवानांनी स्फोटकांद्वारे उडवलं घर, जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जवानांनी स्फोटकांद्वारे उडवलं घर, जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्‍मू काश्मीर : त्रालमध्ये चकमकीत एक दहशतवादी ठार

  • Share this:

श्रीनगर, 5 मार्च : जम्मू-काश्मीरच्या सोपोरमधील त्राल येथे सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत दोन दहशतवाद्याला ठार करण्यात जवानांना यश आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्रालमधील मीर मोहल्ला परिसरात दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली. यानंतर जवानांनी आजूबाजूचा परिसर रिकामा करत शोधमोहीम राबवण्यास सुरूवात केली. यादरम्यानच, एका घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला. दहशतवाद्यांच्या हल्ल्याला जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिलं. यानंतर दहशतवादी ज्या घरात लपले होते ते घरच जवानांनी स्फोटकांद्वारे उडवल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी (4 मार्च) संध्याकाळपासून त्रालमध्ये चकमक सुरू आहे.

वाचा:पाकच्या कुरापतींमुळे सीमेवर तणाव, पूंछमधील सर्व शाळा आज बंद

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर कुरापती पाकिस्तानवर जागतिक स्तरावरील दबाव प्रचंड वाढला आहे. यामुळे बिथरलेल्या पाकिस्ताननं दहशतवादी आणि दहशतवादी संघटनांविरोधात कठोर कारवाई करणार असल्याचे म्हटलं आहे. पण, तरीही सीमारेषेवर तणावपूर्ण परिस्थिती आहे. सीमेवर पाकिस्तानकडून वारंवार गोळीबार सुरूच आहे. नियंत्रण रेषेवरील आताची परिस्थिती पाहता पूंछ जिल्ह्यात सीमारेषेपासून 5 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सर्व सरकारी तसंच खासगी शाळा आज बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. पण, इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहे.

हंदवाडामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरमधील हंदवाडा येथे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. कलीमुल्ला उर्फ काबिल आणि सज्जाद अहमद उर्फ हैदर अशी ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. यातील कलीमुल्ला हा पाकिस्तानातील दहशतवादी होता तर हैदर सोपोरमधील रहिवासी होता. या चकमकीदरम्यान पाच जवानांना वीरमरण आले.

AIRSTRIKE चा सर्वांत मोठा पुरावा : हवाई हल्ल्याच्या वेळी अ‍ॅक्टिव्हेट होते 300 मोबाईल

खूप सहन केला दहशतवाद आता घरात घुसून मारू - नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी(5 मार्च)अहमदाबादमधील जाहीर सभेत बोलताना त्यांनी पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे.'भारतात दहशतवाद पसरवणाऱ्या पाकिस्तानला आता घरात घुसून मारू,'अशा शब्दांत पाकिस्तानला ठणकावले. गेल्या काही दिवसांमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे. त्यात पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केलं जात आहेत. त्यावर 'आम्ही खूप सहन केलं पण आता शत्रूला घरात घुसून मारू' असं मोदी म्हणाले.

'मला सत्तेची पर्वा नाही, देशाची चिंता आहे. पण विरोधकांनी लष्कराच्या शौर्यावर आणि बलिदानावर प्रश्नचिन्हं उपस्थित करू नये. शिव्या द्यायच्या असतील तर मला द्या, पण लष्कराला देऊ नका' असंही ते म्हणाले.'गेल्या 40 वर्षांपासून भारत दहशतवादाला सहन करत आहे. पण मतांच्या पेटीत अडकलेल्या राजकारण्यांनी त्यावर कोणतीही पाऊलं उचललं नाही' असं म्हणत आगामी लोकसभेच्या मैदानात कसून उतरलेल्या काँग्रेसवर मोदींनी बाण सोडला.पुढे ते असंही म्हणाले की, 'मला सत्तेची काळजी नाही आहे. मला माझ्या देशाची काळजी आहे. देशातील नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यामुळे मी आता दहशतवाद सहन करू शकत नाही. घरात घुसून बदला घेण्याच्या तयारीत मी आहे. दहशतवादी पाताळात जरी लपले तरी त्यांना सोडणार नाही' असा थेट इशारा मोदींनी पाकिस्तानला दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 5, 2019 08:16 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading