Home /News /national /

जम्मू-काश्मीरमधून मोठी बातमी, दहशतवाद्यांविरोधात 3 ऑपरेशन सुरू

जम्मू-काश्मीरमधून मोठी बातमी, दहशतवाद्यांविरोधात 3 ऑपरेशन सुरू

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

सलग तिसऱ्या दिवशी सुरक्षा दलाकडून मोठी कारवाई, जैश-एचा दहशतवादी ताब्यात.

    श्रीनगर, 06 मे : देशभरात कोरोना व्हायरसचं महासंकट असतानाच वारंवार दहशतवाद्यांकडून कुरापती सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. सलग तिसऱ्या दिवशी सुरक्षा दलाकडून तीन मोठे दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन करण्यात आले आहेत. अवंतीपुरा, पुलवामा, बेघपोरा अशा तीन ठिकाणी सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांनी या परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती दिली होती. त्यानंतर सुरक्षा दलानं सर्च ऑपरेशन जारी केलं. या सर्च ऑपरेशनदरम्यान लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी भ्याडपणे गोळीबार केला. सुरक्षादलाकडून त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुलवामा इथे झालेल्या चकमकीमध्ये जैश-ए-मोहम्मदचा एक दहशतवादी पकडला आहे. मंगळवारी रात्रीपासून या परिसरात सर्च ऑपरेशनला वेग आला होता. हा दहशतवादी सतूरा गावात लपून बसल्याची माहिती मिळाली होती. दहशतवाद्याकडे असणारी AK47 रायफल, 5 मॅगझीन गन, 3 ग्रेनेड आणि मोबाईल फोन ताब्यात घेतलं आहे. हे वाचा-कोरोनाचा परिणाम, लॉकडाऊनमुळे देशातील 12.2 कोटी लोक बेरोजगार बुधवारी अवंतीपुरामधील शरसाली खुरे परिसरात काही दहशतवाद्यी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. जवानांनी ह्या माहितीच्या आधारे परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केलं. यादरम्यान लपलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर भ्याड हल्ला केला. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. ANI ने दिलेल्या वृत्तानुसार एक दहशतवादी ठार झाल्याची माहिती मिळाली आहे तर आणखी तीन जण लपून बसल्याची माहिती मिळाली आहे. बेघपोरा परिसरात सुरक्षा दलाकडून अजूनही सर्ज ऑपरेशन सुरू आहे. रविवारी हंदवाडा इथे झालेल्या दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत कर्नल, मेजर यांच्यासह तीन जवान शहीद झाले होते. तर जवानांनी सर्ज ऑपरेशन यशस्वी करत 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि बंधिस्त केलेल्या एका कुटुंबाची सुखरुप सुटका केली होती. दहशतवाद्यांच्या कुरापती दिवसेंदिवस सुरू आहेत. कधी शस्त्रसंधीचं उल्लंघन तर कधी घुसखोरी. एकीकडे काश्मीरमध्ये कोरोनाचं महासंकट आहे तर दुसरीकडे या कुरापती. हे वाचा-लॉकडाऊनमध्ये 9 महिन्यांच्या मुलाला घेऊन 1000 किमी चालणाऱ्या महिलेची कहाणी संपादन- क्रांती कानेटकर
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या