काश्मीर खोऱ्यात तणाव! मोबाइल-इंटरनेट सेवा बंद; आतापर्यंतच्या 10 मोठ्या घडामोडी

काश्मीर खोऱ्यात तणाव! मोबाइल-इंटरनेट सेवा बंद; आतापर्यंतच्या 10 मोठ्या घडामोडी

काश्मीर खोऱ्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 5 ऑगस्ट : काश्मीर खोऱ्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. खोऱ्यात अतिरिक्त सैनिकांचा फौजफाटा तैनात करण्यात आल्यानंतर यादरम्यान अटकसत्रदेखील सुरू करण्यात आले आहे. पण या वृत्तास अद्याप अधिकृतरित्या दुजोरा मिळालेला नाही. पोलिसांनी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि महबूबा मुफ्ती यांना स्थानबद्ध करण्यात आलं आहे. तसंच जम्मू काश्मीरमध्ये कलम 144 देखील लागू करण्यात आलं आहे.

जम्मू काश्मीरमधील 10 महत्त्वपूर्ण घडामोडी

1. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीच्या सर्व माजी मंत्र्यांनाही नजरकैदेत ठेवण्यात आल्याची माहिती.

2. काश्मीर खोऱ्यात तणावाची परिस्थिती, मोबाइल इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांना आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांना सॅटेलाइट फोन देण्यात आले आहेत.

(वाचा :जम्मू काश्मीरमध्ये तणाव, मोदी सरकार ऐतिहासिक निर्णय घेणार?)

3. जम्मू काश्मीर आणि श्रीनगरमध्ये कलम 144 लागू करण्यात आलं आहे.

4. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत रविवारी (4 ऑगस्ट)घेण्यात आलेल्या बैठकीत जम्मू काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेतला.

5. पाकिस्तानी दहशतवादी हल्ला करण्याची शक्यता असल्यानं अमरनाथ यात्रेकरू आणि पर्यटकांना तातडीनं काश्मीर सोडण्याचे आदेश

6. तणावाची परिस्थिती पाहता जम्मू-काश्मीरमध्ये शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

7. जम्मू-काश्मीरचे 3 तुकडे होणार ? कलम 35 अ, कलम 370 रद्द होणार ? जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा हटवण्याची तयारी ?

काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील 35 अ कलम रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकार काही दिवसांत घेणार असल्याची शक्यता, अशी जोरदार चर्चा सुरू आहे.

8. जम्मू-काश्मीरमध्ये पेट्रोल-डिझेलचा तुटवडा, लोकांकडून अत्यावश्यक वस्तूंची जोरदार खरेदी

(वाचा : इरफानने जिंकलं मन! काश्मीर सोडण्याच्या आदेशानंतर इतर खेळाडूंना पोहोचवलं घरी, नंतरच सोडलं राज्य)

9. जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशननं भारताचा क्रिकेटपटू इरफान पठाण आणि त्याच्यासोबत 100 हून अधिक खेळाडूंना काश्मीरमधून तात्काळ परतण्याचे आदेश दिले होते. इरफान पठाण आणि त्याच्यासोबत असलेल्या सपोर्ट स्टाफमधील इतर लोक रविवारीच (4ऑगस्ट)तिथून परतले. काश्मीरमधील लोकांनीच राज्यात थांबावं, असा आदेश सरकारकडून देण्यात आला आहे. दरम्यान, भारताचा क्रिकेटपटू इरफान पठाणने काश्मीर सोडण्यापूर्वी तिथल्या स्थानिक मुलांना आधी घरी सोडले.

10. शहरातील सचिवालय, पोलीस मुख्यालय, विमानतळ यांसारख्या संवेदनशील ठिकाणांच्या सुरक्षेत वाढ

VIDEO: विलेपार्लेमध्ये नागरिकांनी केला हायवे बंद, अपघात झाल्याची माहिती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 5, 2019 11:13 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading