जम्मू-काश्मीर: पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचा जवान शहीद

जम्मू-काश्मीर: पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचा जवान शहीद

राजौरी भागातील नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं.

  • Share this:

राजौरी, 10 जुलै: कोरोना व्हायरसचं जम्मू-काश्मीरमध्ये थैमान सुरूच आहे. त्यात भारत-चीन तणावाचं वातावरण आणि हवामानातील बदल आणि सातत्यानं पाकिस्तानच्या सुरू असणाऱ्या कुडघोड्यांचा भारतीय जवानांना सामना करावा लागत आहे. गुरुवारी सकाळी दु:ख बातमी समोर आली आहे. पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. यावेळी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देताना सुरक्षा दलातील जवान शहीद झाला आहे.

राजौरी भागातील नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. यावेळी पाकड्यांना चोख प्रत्युत्तर देताना सुरक्षा दलाचा जवान शहीद झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानच्या कुरघोडी सुरूच आहेत. याशिवाय जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीचं प्रमाणही वाढत आहे. घुसखोरांविरोधात सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. एकीकडे घुसखोरांविरुद्धची कारवाई आणि कोरोनाचं आव्हान असतानाच आता पाकिस्तानने सीमेपलिकडून गोळीबार सुरू केला.

भारत सध्या 5 मोठ्या आव्हानांचा एकाच वेळी सामना करत आहे. कोरोना व्हायरस, भारत चीन संघर्ष, सीमेपलिकडून होणारं शस्रसंधीचं उल्लंघन आणि दहशतवाद्यांची घुसखोरी, कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला होणारं नुकसान. या सगळ्याच आव्हानांना एकाच वेळी समोर जात आहे. जवान बदलतं हवामान आणि कोरोनासोबत वारंवार होणाऱ्या पाकड्यांकडून होणाऱ्या नापाक कारवायांनाही चोख उत्तर देत आहेत.

Published by: Kranti Kanetkar
First published: July 10, 2020, 9:57 AM IST

ताज्या बातम्या