भारतीय सैन्याला सर्वात मोठं यश! 13 दिवसात 24 अतिरेक्यांचा केला खात्मा

भारतीय सैन्याला सर्वात मोठं यश! 13 दिवसात 24 अतिरेक्यांचा केला खात्मा

1 जानेवारीपासून आतापर्यंत तब्बल 100 अतिरेक्यांचा खात्मा करण्यात भारतीय लष्काराल यश आलं आहे.

  • Share this:

शोपियान, 19 जून : जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून भारतीय सैन्य आणि अतिरेक्यांमध्ये मोठी चकमक सुरू आहे. भारतीय सुरक्षा दल आणि अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत आतापर्यंत 7 दहशतवाद्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. असं म्हटलं जातंय की दहशतवादी अवंतीपोरा येथील मॅजेपंपोर येथे चकमकीच्या भीतीने मशिदीत लपले होते. प्रदीर्घ गोळीबारात शोपियांमध्ये 4 आणि पामपोरमध्ये 3 दहशतवादी ठार झाले. परिसरात अजूनही शोधमोहीम सुरू आहे.

मुख्य म्हणजे गेल्या 13 दिवसांत तब्बल 24 अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला आहे. भारतीय सुरक्षा दलाला मिळालेलं हे सर्वात मोठं यश आहे.

जम्मू काश्मीर पोलीस आणि सुरक्षा दल यांनी आज पाम्पोरमध्ये एका अतिरेक्याला ठार केलं. याशिवाय दोन अतिरेकी जवळच्या एका मिशिदीमध्ये घुसले होते. त्यानंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आला. त्यानंतर काही वेळानं दोन्ही अतिरेक्यांना पडकल्याची माहिती जम्मू काश्मीरचे डीजीपी दिलबक सिंग यांनी दिली.

वाचा-चिनी सैनिकांविरोधात मुंबईत तयार होतायेत भारतीय जवानांसाठी नवे सुरक्षाकवच

वाचा-निषेध चीनचा, पुतळा जाळला पाहा कुणाचा! अतिउत्साही कार्यकर्त्यांचं ज्ञान उघड

जम्मू काश्मीरच्या पाम्पोर आणि शोपियानमध्ये गुरुवारी 6 अतिरेक्यांना ठार करण्यात आलं. दरम्यान 1 जानेवारीपासून आतापर्यंत तब्बल 100 अतिरेक्यांचा खात्मा करण्यात भारतीय लष्काराल यश आलं आहे.

वाचा-चीनला धडा शिकवण्यासाठी भारताची तयारी, सीमारेषेवर हालचालींना वेग

संपादन-प्रियांका गावडे.

First published: June 19, 2020, 9:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading