काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या पुन्हा कुरापती, त्रालमध्ये आयईडीचा स्फोट

जम्मू काश्मीरच्या त्रालमध्ये आयईडी स्फोट झाला असल्याची माहिती समोर येत आहे. पुलवामातील हल्ल्यानंतर आता पुन्हा एकदा आयइडी हल्ला झाल्याची माहिती समजली आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 2, 2019 11:51 AM IST

काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या पुन्हा कुरापती, त्रालमध्ये आयईडीचा स्फोट

रिफत अब्दुला, प्रतिनिधी जम्मू-काश्मीर, 02 मार्च : गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. या वाढत्या तणावामुळे जम्मूतील अनेक ठिकाणी पाकिस्तानकडून सतत गोळीबार करण्यात येत आहे. आताही जम्मू काश्मीरच्या त्रालमध्ये आयईडी स्फोट झाला असल्याची माहिती समोर येत आहे. पुलवामातील हल्ल्यानंतर आता पुन्हा एकदा आयइडी हल्ला झाल्याची माहिती समजली आहे. या स्फोटामध्ये एक घर उद्ध्वस्त झालं आहे. यात कोणतीही जीवित हानी झाल्याचं वृत्त नाही आहे. रस्त्यावर कोणीही नसल्याने मोठी दुर्घटनाटळली. पण यात एक जण जखमी झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.

या स्फोटानंतर काही फोटो समोर आले आहेत. यात तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर मोठे खड्डे तयार करण्यात आले आहेत. या खड्ड्यांमुळे लष्कराच्या गाड्यांना अडथळा निर्माण करण्याचा दहशतवाद्यांचा प्लान असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्करी ताफ्यावर हल्ला करण्याची योजना आखण्यात आल्याचंही सांगण्यात येत आहे. दरम्यान, जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये जिल्हा रुग्णालयाजवळ असलेल्या जमात ए इस्लामीच्या कार्यालयाला पोलिसांकडून सील करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव अजूनही निवळलेला नाही.

सीमारेषेलगत असलेल्या राजौरी आणि पुंछ भागात मोठ्या प्रमाणात पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. पुंछमध्ये झालेल्या गोळीबारात मोहम्मद युनूस जखमी झाले तर त्यांची पत्नी रबीना कौसर (32) फजान (5), आणि मुलगी शबनम (9 महिने) यांचा मृत्यू झाला. मोहम्मद युनूस यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या गोळीबारात पाकने मोठ्या शस्त्रांचाही वापर केला असल्याचं कळतं आहे.

हेही वाचा : Breaking: पुलवामातील 'जमात-ए-इस्लामी'चं कार्यालय सील, अजूनही चकमक सुरूच

Loading...

पाकिस्तानातून जम्मूच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वारंवार गोळीबार करण्यात येत आहे. दरम्यान, जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यामध्ये हंदवाडात बाबागुड लंगेट परिसरात शुक्रवारी दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये 4 सीमा सुरक्षारक्षक शहीद झाले तर या हल्ल्यात 8 पेक्षा जास्त जवान जखमी झाले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआरपीएफ आणि लष्कराचे जवान हे दहशतवाद्यांचे शव आणण्यासाठी गेले होते. यामध्ये 2 दहशतवाद्यांचे मृतदेह होते. भारतीय जवान तिथे पोहचताच मृतदेहांपैकी एक दहशतवादी अचानक उठला आणि त्याने अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. या गोळीबारामध्ये 4 भारतीय जवान शहीद झाले आहेत तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तर त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे.

सध्या सुरक्षादलांमध्ये आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार सुरू आहे. अभिनंदन भारतात परतत असतानाच पकिस्तानने शुक्रवारी पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारतीय चौक्यांवर गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा केला. नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानने ही आगळीक केली. भारतानेही पाकिस्तानच्या या कुरापतीला चौख प्रत्युत्तर दिलं.

हेही वाचा : VIDEO : पाककडून सीमेवर गोळीबार, 9 महिन्याच्या चिमुकलीसह आई आणि भावाचा मृत्यू

शांततेच्या गप्पा मारत असतानाच सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. सायंकाळी नौशेरा भागात पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. त्याला भारताने जोरदार प्रत्युत्तर दिलं. गेल्या गेल्या आठ दिवसांपासून भारतीय चौक्यांवर गोळीबार करत असून दोन दिवसांमध्ये पाकिस्तानने 36 पेक्षा जास्त वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली.


अभिनंदन यांचा मायभूमीत परतण्याचा पहिला VIDEO 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 2, 2019 10:55 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...